विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशीचे वायकरांचे आदेश – eNavakal
आरोग्य गुन्हे मुंबई

विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशीचे वायकरांचे आदेश

मुंबई: जोगेश्वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना गृहनिर्माण राज्यमंत्री तसेच जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमानुसार बचतगटाचे किचन होते का? याचीही तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
13 डिसेंबर 2017 रोजी जोगेश्वरी पुर्व, शामनगर येथील बालविकास विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत देण्यात आलेली खिचडी खाल्याने सुमारे 38 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या घटनेनंतर या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने कोकण तसेच ट्रॉमा सेंटर केअर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आज सकाळी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी तातडीने बालविकास विद्यामंदिर शाळेला भेट दिली.
या घटनेनंतर दोन मुलांच्या पोटांतील अन्नाचे नमुने तसेच सातही डब्यातील खिचडीची नमुने घेण्यात आले आहेत. या अन्नामध्ये विष होते का? याची तपासणी करण्यासाठी शासनाच्या कालिना येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागानेही नमुने आपल्या प्रयोगशाळेत नेले आहेत. गोडाऊनमधील धान्याचे नमुनेही घेण्यात आल्याची माहिती, मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पांडुरंग पाटील यांनी राज्यमंत्री यांना दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आजपासून पुणे परिवहनच्या बसेसचा सीएनजी पुरवठा बंद

पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)चा पुरवठा आज 24 मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या असांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More