विद्यार्थी निवडणुका ३० ऑगस्टला! वेळापत्रक जाहीर – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

विद्यार्थी निवडणुका ३० ऑगस्टला! वेळापत्रक जाहीर

मुंबई – राज्यात सध्या विद्यार्थी निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तब्बल २८ वर्षांनी राज्यात महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये ३० ऑगस्ट रोजी प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि सचिवांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान होईल. महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींतून विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी आणि महिला प्रतिनिधी यांची निवड करण्यात येणार असून विद्यापीठ विद्यार्थी परिषद ३० सप्टेंबरपासून कार्यरत होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत लागू राहील.

कोणतीही राजकीय संघटना, पक्षाच्या छत्राखाली कार्यरत असलेल्या संघटना या निवडणुकीत थेट सहभागी होऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पॅनेल तयार करूनही निवडणुका लढवता येणार नाहीत. एखाद्या उमेदवारासाठी कोणत्याही राजकीय संघटनेचा हस्तक्षेप झाला तर त्याची उमेदवारी रद्द करण्याची तरतूद नियमांमध्ये आहे.

निवडणूक वेळापत्रक

मागासवर्ग प्रतिनिधींच्या आरक्षणाची सोडत – १९ ऑगस्ट

तात्पुरती मतदार यादी जाहीर करणे – २० ऑगस्ट

मतदार यादीवर आक्षेप नोंदवणे – २१ आणि २२ ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत)

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे – २२ ऑगस्ट (दुपारी ३ वाजता)

उमेदवारी अर्ज भरणे – २३ ऑगस्ट (सकाळी ११ ते सायंकाळी ५)

नमुन्यात अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी पदांसाठी अर्ज दाखल करणे – २३ ऑगस्ट (सकाळी ११ ते सायंकाळी ५)

विद्यार्थी प्रतिनिधींच्या अर्जांची छाननी – २६ ऑगस्ट (सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)

विद्यार्थी प्रतिनिधींच्या वैध नामनिर्देशन अर्जांची यादी प्रसिद्ध करणे – २६ ऑगस्ट (सायंकाळी ५ नंतर)

उमेदवारी अर्जांवरील आक्षेपांची सुनावणी – २७ ऑगस्ट (सकाळी १० ते दुपारी १)

आक्षेपांच्या निर्णयाविरोधात दाद मागणे – २७ ऑगस्ट (दुपारी २ ते सायंकाळी ६)

विभाग प्रतिनिधी पदाचे अर्ज मागे घेण्याची तारीख – २८ ऑगस्ट (सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत)

उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे – २८ ऑगस्ट (दुपारी ४)

विभाग आणि महाविद्यालयांमध्ये मतदान – ३० ऑगस्ट (सकाळी ११ ते दुपारी ३)

मतमोजणी आणि निकाल – ३० ऑगस्ट (दुपारी ४ वाजल्यानंतर)

निवडून आलेले अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी यांची सविस्तर माहिती – ३० ऑगस्ट (दुपारी ४ नंतर)

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचा निवडणूक कार्यक्रम

विद्यार्थी संघाची तात्पुरती यादी प्रसिद्ध करणे – ७ सप्टेंबर (सकाळी ११ वाजता)

यादीवरील आक्षेप नोंदणी – ७ ते ९ सप्टेंबर (सकाळी ११ ते दुपारी ४)

आक्षेपावरील सुनावणी – ९ सप्टेंबर (सायंकाळी ५ नंतर)

विद्यार्थी संघाची अंतिम यादी प्रसिद्ध करणे – १३ सप्टेंबर (सकाळी ११ वाजता)

अर्ज सादर करणे – १६ सप्टेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

छाननी – १७ सप्टेंबर (सकाळी ११ ते दुपारी ४)

उमेदवारांची अंतिम यादी – २० सप्टेंबर

अध्यक्ष, सचिव व इतर पदांसाठी मतदान – २४ सप्टेंबर (सकाळी ११ ते दुपारी ३)

मतमोजणी व निकाल – २७ सप्टेंबर

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेची घोषणा – ३० सप्टेंबर

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More
post-image
देश

पाकिस्तानात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडेच केली सेक्सची मागणी

इस्लामाबाद – कोरोनाविरोधात आरोग्य सेवकांकडून अहोरात्र मेहनत सुरू आहे. मात्र या डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफना मात्र कोरोनाबाधित लोकांकडून त्रात होत आहे. काही ठिकाणी...
Read More
post-image
देश

आम्हाला तुमचा अभिमान, पाकिस्ताननं केली भारताची स्तुती

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत केली आहे. एअर इंडियानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे, जीवनावश्यक...
Read More
post-image
देश

लॉकडाऊन संपल्यानंतरच घेणार शाळा-महाविद्यालयांबाबत निर्णय

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय. इयत्ता दहावीचा एक पेपर रखडला आहे. तर, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा...
Read More