विदर्भ होरपळला! ‘रेड अलर्ट’ जारी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

विदर्भ होरपळला! ‘रेड अलर्ट’ जारी

नागपूर – मे महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण विदर्भ उन्हाच्या काहिलीने होरपळून निघाला आहे. अनेक जिल्ह्याचे तापमान 45 अंशांवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्टनंतर संपूर्ण विदर्भात आता ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

अकोल्याचे तापमान 47 अंशांवर पोहोचले आहे. तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील नागरिक प्रचंड ऊन आणि गरमीने हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी सकाळी अकरा वाजता 41अंश से.तापमानाची नोंद झाली आहे. दुपारपर्यंत पारा 45 अंशांवर पोहोचलेला पाहायला मिळाला. पूर्व विदर्भात तापमानाची तीव्रता अधिक जाणवत आहे. भरपूर पाऊस पडणारे हे सर्व जिल्हे उन्हाच्या तडाख्यात सापडले आहेत. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More