वित्त आयोगाच्या माहितीमध्ये गफलत – वित्तमंत्री मुनगंटीवार – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

वित्त आयोगाच्या माहितीमध्ये गफलत – वित्तमंत्री मुनगंटीवार

मुंबई –  राज्य सरकारने आर्थिक आघाडीवर निराशाजनक कामगिरी केल्याच्या वित्त आयोगाचा अहवाल असल्याचे समोर आल्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सनदी अधिका-यांसमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रानी दिली आहे. राज्याचे वित्त सचीव यू पी एस मदान यांच्यासह वित्त विभागाच्या अधिका-यांसमोर ही नाराजी व्यक्त करताना वित्तमंत्री संतप्त झाल्याची माहिती या सूत्रानी दिली आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्या वित्त आयोगासमोर योग्य ते सादरीकरण करेल आणि त्यांना राज्याच्या वित्तीय स्थितीबाबतची वस्तुस्थिती विशद करेल असे सांगितले.
सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, विरोधकांना खूप आनंद झाला आहे. वित्त आयोगाच्या माहितीत घेण्यात गफलत झाली आहे. त्यांनी आमच्या आर्थिक स्थितीवर ताशेरे ओढलेले नाहीत. हे आम्ही वित्त आयोगासमोर आमची भूमिका मांडून आयोगचे समाधान करू, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. राज्याची वित्त अवस्था मागील तीन वर्षांपासून खालावली असल्याचे केंद्रीय वित्त आयोगाने म्हटले आहे. यावर विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. सध्या केंद्रीय वित्त आयोगाचे प्रतिनिधी राज्याच्या दौ-यावर आहेत. यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सत्तेतील भागीदार शिवसेनेने देखील भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. याबाबत विचारणा केली असता अर्थमंत्री मुनगंटीवार
म्हणाले, की आम्ही विकासाची कामे केली आहेत. मुंबईसाठी ५० हजार कोटींची मागणी केली आहे. मराठवाडयाचा विकास करण्यासाठी २५ हजार कोटींची मागणी आम्ही आयोगाकडे लावून धरणार आहे. वित्त आयोगासमोर सर्व माहिती ठेवल्यानंतर आयोगाचे समाधान होईल, अशी आम्ही खात्री आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने आज मुख्यमंत्र्यांसमोर वित्त विभागाच्या अधिका-यांनीच वित्त आयोग भेटील येण्या आधी गोपनीय माहिती कशी सार्वजनिक केली असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला. सनदी अधिका-यांच्या माध्यमातूनच अशी माहिती बाहेर जात असेल तर आम्ही देखील त्यांच्या चूकांवर पांघरूण का घालावे असा सवाल वित्तमंत्र्यानी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सनदी अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळेच राज्य सरकारची बेअब्रू झाल्याबाबत मुख्यमंत्र्यानी देखील यावेळी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रानी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More
post-image
News महाराष्ट्र

प्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालयात

महाड- शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना रक्तदाब कमी झाल्याचा त्रास झाल्याने महाड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळच्या सुमारास...
Read More