विठूरायाच्या दर्शन पास विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर निलंबित – eNavakal
महाराष्ट्र

विठूरायाच्या दर्शन पास विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर निलंबित

पंढरपूर – संपूर्ण महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या व्हीआयपी दर्शन पास विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार, शिवसेनेच्या कोट्यातील मंदिर समितीचा सदस्य सचिन आधटरावला निलंबित करण्याचे आदेश राज्याच्या विधि व न्याय विभागाने दिले आहेत.
हैदराबाद येथील भाविकांना दर्शन पास विकण्याचा प्रकार मंदिराच्या व्हीआयपी गेटवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे निदर्शनास आला होता. या प्रकरणी 31ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दर्शन पास विक्री करणारे दोन एजंटही पोलिसांनी गजाआड केले होते. तपासात मंदिर समितीचा सदस्य सचिन आधटराव याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सचिन आधटरावला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने तिन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे शासन नियुक्त मंदीर समितीची राज्यभर बदनामी झाली होती.
7 सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांची बैठक होऊन आधटरावचे समिती सदस्य पद रद्द करावे असा एकमताने ठराव संमत करून शासनाच्या विधि व न्याय विभागाला तात्काळ पाठविण्यात आला होता. परंतू जवळपास दोन महिन्यांपासून राज्याच्या विधि व न्याय विभागाने काहीच कारवाई केली नसल्याने वारकरी भाविकांत संताप व्यक्त होत होता. याची दखल घेत विधि व न्याय विभागाने आधटरावला निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More