विठुरायाच्या दर्शनाला जाताना अपघात 2 जण ठार! 16 जखमी – eNavakal
News महाराष्ट्र

विठुरायाच्या दर्शनाला जाताना अपघात 2 जण ठार! 16 जखमी

जळगाव – आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणार्‍या कुटुंबावर काळाने झडप घातली. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या काकणबर्डी गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले, बस आणि कारमधील 15 ते 16 जण जखमी झाले आहेत.
बापू रघुनाथ मराठे (48) आणि परी मराठे (8) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. बापू मराठे हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकांना सोबत घेऊन एरंडोलहून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे आषाढी  एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी कारने जात होते. पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी ते ओझर रस्त्यावर त्यांच्या कारला समोरून भरधाव येणार्‍या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक बापू मराठे आणि त्यांच्या साडूची मुलगी परी हे जागीच ठार झाले आहेत. तर कारमधील सरला बापू मराठे (36), गौरव बापू मराठे (18), मयुरी पाटील (16), रेखा पाटील (36), ओम पाटील (5) हे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. त्यामुळे बसमधील 8 ते 10 प्रवाशी देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच काकणबर्डी तसेच ओझर गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातातील जखमींना तत्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More