विजय शिवतारे रुग्णालयात! हृदयविकाराचा सौम्य झटका – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य मुंबई

विजय शिवतारे रुग्णालयात! हृदयविकाराचा सौम्य झटका

मुंबई – शिवसेना नेते आणि जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना सोमवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्ष विभागात उपचार सुरू आहेत मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे चिरंजीव विनय शिवतारे यांनी दिली आहे.

दोन वर्षांपूर्वीदेखील हृदयाचा त्रास जाणवल्याने विजय शिवतारे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ईसीजीतून त्यांना तीन-चार दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता पुन्हा झटका आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शिवतारे यांनी शनिवार दि. १७ रोजी तालुक्यात दिवसभर विविध कार्यक्रम पार पाडले. सायंकाळी ५ च्या सुमारास घरी येऊन त्यांनी जेवण केले. जेवणानंतर दवणेमळा व जवळार्जुन आदी गावात निर्धारित कार्यक्रमांसाठी निघायची तयारी चालू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. याबाबत तात्काळ चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. आत्राम यांना कळविण्यात आले. आत्राम यांनी तपासण्या केल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ना. शिवतारे यांचे चिरंजीव विनय यांनी शिवतारे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. विनय शिवतारे म्हणाले, २०१२ साली केलेल्या उपोषणानंतर त्यांची किडनी दुखावली होती. त्यानंतर वरचेवर उपचार करून डॉक्टरांनी किडनीचे कार्य व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी अधूनमधून शिवतारे यांना त्रास जाणवतो. यावेळी मात्र किडनीचे कार्य बिघडल्यामुळे त्याचा परिणाम हृदयावर होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शनिवारी ते अस्वस्थ जाणवले. ते अतिदक्षता विभागात असून गुरुवारी सर्व चाचण्यांचे अहवाल पाहून पुढील उपचाराबाबत डॉक्टर निर्णय घेणार आहेत असेही विनय शिवतारे म्हणाले.

दरम्यान, शिवतारे यांना भेटण्यास रुग्णालय प्रशासनाने परवानगी दिलेली नसल्याने रुग्णालयात गर्दी करू नये. ते लवकरच त्याच तडफेने कार्यरत होतील, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी सांगितले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More