विजय मल्ल्याला भारतात आणणार, लंडनच्या कोर्टाने दिली परवानगी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

विजय मल्ल्याला भारतात आणणार, लंडनच्या कोर्टाने दिली परवानगी

 लंडन – भारतीय बँकांना तब्बल 9000 कोटींचा चुना लावून विदेशी फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला मोठा दणका बसला आहे. लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने आज विजय मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करा असे आदेशच दिले आहेत. लंडन कोर्टाच्या या निर्णयाचे सीबीआयनेही स्वागत केले आहे. विजय मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार असल्याचे समजते आहे.
मद्यसम्राट विजय मल्ल्या भारतातील बँकांचे 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झाला होता. विजय मल्ल्या फरार झाल्यानंतर पैसे मिळवण्यासाठी बँकांनी तगादा लावला होता. आपली रक्कम मिळवण्यासाठी बँकांनी मल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणली होती. मल्ल्याच्या देश-विदेशातील संपत्तीचा लिलाव करून विक्री करण्यात आली होती. दोन दिवसांपुर्वी मल्ल्याने मी बँकांचे संपुर्ण कर्ज फेडण्यास तयार असून व्याज देणार नसल्याचे पत्र सरकारला पाठविले असल्याचे म्हटले होते. तसेच आज सुनावणीच्या आधी विजय मल्ल्याने मी आधीही बँकांचे कर्ज फेडण्यासंबंधी बोललो होतो. कर्ज फेडण्याच्या माझ्या वक्तव्याचे प्रत्यार्पणाशी काहीही देणेघेणे नसल्याचे त्याने म्हटले. त्यानंतर लंडन वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने मल्ल्याला दणका देत त्याचे प्रत्यार्पण भारताकडे करा असा मोठा निर्णय दिला. लंडन कोर्टाच्या या निर्णयाने सीबीआय आणि ईडीच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More