विजय मल्ल्या ‘फरार आर्थिक गुन्हेगार’? आज फैसला – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

विजय मल्ल्या ‘फरार आर्थिक गुन्हेगार’? आज फैसला

मुंबई – भारतीय बँकांना तब्बल 9000 कोटींचा चुना लावून विदेशी फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ आहे का? याचा आज फैसला होणार आहे. विजय मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात मुंबईतील न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने विजय मल्ल्याला आज आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर केल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. न्यायालयाने विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर केल्यास ईडीला(ED) त्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार प्राप्त होईल.

केंद्र सरकारने घोटाळेबाजांवर वचक ठेवण्यासाठी फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 आणला होता. देशात मोठे आर्थिक घोटाळे, बँकांची फसवणूक करून गुन्हेगार परदेशात पलायन करतात. त्यानंतर त्यांचे प्रत्यार्पण, खटले यामध्ये खूप वेळ वाया जातो. जर भारतामध्ये न्यायालयाने संबंधित व्यक्तीला ‘आर्थिक गुन्हेगार’ जाहीर केले तर त्याच्या मालमत्तेच्या जप्तीचा मार्ग मोकळा होतो. आज न्यायालयाने मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास या कायद्याअंतर्गत ईडीला मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात समूह संसर्गाला सुरुवात? राजेश टोपे म्हणाले…

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा (corona Virus) आकडा दिवसेंदिवस वाढत असून निमयित साडेचार ते पाच हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात समूह संसर्ग म्हणजेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सरकारी महसुलात घट, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात

पुणे – लॉकडाऊनमुळे सरकारच्या महसुलात घट झाल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करावी लागेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

पंढरपुरला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: चालवली ८ तास गाडी

मुंबई – वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा खंडीत न करता वारीचं स्वरुपत सीमित करून साधेपणाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त ना विठूचा गजर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यांना दिलेलं धान्य गेलं कुठे? फक्त १३ टक्केच स्थलांतरीत मजुरांनी घेतला मोफत धान्याचा लाभ

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये याकरता केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवली जाते आहे. या योजनेअंतर्गत लोकांना मोफत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

सीमेवरील तणाव चीनमुळेच! भारत-चीन वादात अमेरिकेचीही उडी

वॉशिंग्टन – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून...
Read More