विजय मल्ल्याचा आठवड्याचा खर्च १६लाख रुपये – eNavakal
गुन्हे देश विदेश

विजय मल्ल्याचा आठवड्याचा खर्च १६लाख रुपये

लंडन  -भारतातील बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्याला लंडनमधील हायकोर्टाने आठवड्याचा खर्च वाढवून दिला आहे . ब्रिटनमधील न्यायालयाने ९० दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे . मद्यसम्राट विजय मल्ल्याचा शाही थाट काही कमी झालेला नाही. मल्ल्याचा आठवड्याचा खर्च तब्बल १८, ३२५ युरो म्हणजेच १६ लाख रुपये इतका आहे.  यापूर्वी मल्ल्याच्या आठवड्यातील खर्चावर ५ हजार युरोची (४.५ लाख) मर्यादा होती. ती आता वाढवून १८, ३२५ युरो (१६ लाख रुपये) इतकी करण्यात आली आहे. एखाद्या शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या तरुणा  इतका पगार विजय मल्ल्याचा आठवड्याचा खर्च असल्याचे समजते. विजय मल्ल्याला ९० दशलक्ष डॉलरची भरपाई देण्याचे आदेश सोमवारी ब्रिटनमधील न्यायालयाने दिले. २०१४ मध्ये किंगफिशर एअरलाइन्सने सिंगापूरच्या बीओसी एव्हिएशन या कंपनीकडून चार प्रवासी विमान भाड्याने घेण्याचा करार केला होता. त्यापैकी ३ विमाने किंगफिशर एअरलाइन्सला मिळाली. तर किंगफिशरने या करारात ठरलेली रक्कम न दिल्याने चौथे विमान देण्यात आले होते.याच थकबाकी वसूली करता बीओसी एव्हिएशनने किंगफिशरवर खटला भरला होता .इतकं सार होऊन देखील   विजय मल्ल्याच्या राहणीमानात फरक पडू शकत नसल्याचे बोलले जात आहे .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More