विखे-पाटलांच्या कारखान्याची चौकशी! कर्जमाफीचे पैसे गेले कुठे? – eNavakal
News महाराष्ट्र

विखे-पाटलांच्या कारखान्याची चौकशी! कर्जमाफीचे पैसे गेले कुठे?

औरंगाबाद – महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि महाराष्ट्रातील बडे साखरसम्राट राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. कारखान्याच्या सभासद शेतकर्‍यांच्या नावाने घेतलेल्या 9 कोटी रुपये कर्जाची विल्हेवाट कुठे
आणि कशी लावली ते न्यायालयाला सांगा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या 9 कोटी रुपयांचा हिशोब देणारा अहवाल पोलिसांनी 14 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाला सादर करावा व तपासादरम्यान हा पैशाचा व्यवहार दखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या स्वरूपाचा आहे असे निष्पन्न झाल्यास कारखान्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असेही आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. कारण कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची यादी तसेच त्यांना वाटप केलेल्या कर्जाचा आणि धनादेशाचा (चेकचा) तपशीलच बँकांकडे नसल्याचे लेखा परिक्षणात आढळून आले. त्यामुळे हा प्रकार शेतकर्‍यांच्या नावे परस्पर कर्ज उचलण्याचा असल्याचा संशय आहे.
विखे-पाटील सहकारी साखार कारखान्याने सभासद शेतकर्‍यांना ‘बेसल डोस’ देण्यासाठी सभासद शेतकर्‍यांच्या नावे युनियन बँकेकडून 2 कोटी 50 लाख रुपये आणि बँक ऑफ इंडियाकडून 4.65 कोटी रुपये कर्ज घेतले. 2009 साली सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. बँकांनी कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविताच त्यांची कर्जे माफ झाली. मात्र लेखा परिक्षणात शेतकर्‍यांचा तपशील न मिळाल्याने शासनाने 2013 साली व्याजासह 9 कोटी परत घेतले. मात्र 9 कोटी रुपये कारखान्याने दिले कुठून? शेतकर्‍यांची यादी कुठे गेली? धनादेश कुठे गेले? याची आता चौकशी होणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More