विखेंच्या जागी बाळासाहेब थोरात विधीमंडळ नेतेपदी निवड – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

विखेंच्या जागी बाळासाहेब थोरात विधीमंडळ नेतेपदी निवड

मुंबई – महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपाची वाट धरल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. मात्र विधानसभेतील राज्याचे विरोधी पक्षनेते बनण्यात बाळासाहेब थोरातांना अनेक अडचणी आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसही या पदावर दावा करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाळ यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी आमदार नसीम खान यांची निवड करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या विधान परिषदेवरील गटनेतेपदी शरद रणपिसे यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपनेतेपदी रामहरी रुपनवार हे असतील. विधानसभेच्या मुख्य प्रतोदपदी बसवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, के.सी.पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाई जगताप यांना विधानपरिषदेचे प्रतोद बनविण्यात आले आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, नितेश राणे यांच्या पाठोपाठ आणखी आमदार काँग्रेस सोडून जाऊ नयेत म्हणून काँग्रेसने जवळजवळ बहुतेक आमदारांना नेतेपद व प्रवक्तेपद वाटण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More