विक्रेत्यांना तहसीलदारांनी दिली गुटखा न विकण्याची शपथ – eNavakal
News महाराष्ट्र

विक्रेत्यांना तहसीलदारांनी दिली गुटखा न विकण्याची शपथ

अकोले – ३१ मे या जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त अकोले(जि.नगर) तहसीलदार यांच्या पुढाकाराने व अकोले पोलिस स्टेशन व अकोले तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्ममाने अकोलेतील गुटखा विक्री करणाऱ्या टपरीधारक,किराणा दुकानदार यांना गुटखा विक्री न विकण्याची शपथ देण्यात आली. तसेच प्रत्येक दुकानात लावण्यासाठी ‘ येथे तंबाखू व गुटखा विक्री केली जात नाही’ या स्टिकरचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना तहसीलदार मुकेश कांबळे म्हणाले की, शासनाने गुटखाबंदी केली कारण गुटखा खाऊन कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठे आहे. देशात 15 लाख मृत्यू हे तंबाखू जन्य पदार्थांमुळे होतात.तेव्हा अकोल्यात गुटखाबंदी ची अंमलबजावणी आपण प्रबोधनाने करतो आहोत. लहान मुलांना तर कोणताच तंबाखूजन्य पदार्थ देऊ नये. यानंतर तहसीलदार यांनी सर्वांना यापुढे गुटखा विकणार नाही व गुटखा बंदी यशस्वी करू अशी शपथ सर्वांना दिली.गुटखा विक्रीची शिक्षा कलमे सांगितली.दुकानात लावण्यासाठी स्टिकर प्रत्येक दुकानदाराला देण्यात आले। हे स्टिकर प्रत्येक दुकानात लावायचे असून त्यावर या दुकानात गुटखा विक्री केली जात नाही, गुटखा खाण्याने कॅन्सर होऊ शकतो असे स्पष्टपणे लिहिले आहे. कार्यक्रमाचे स्वागत बाळासाहेब मालूजकर यांनी केले . हेरंब कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले व प्रबोधन व कायदा यानेच कोणतीही बंदी यशस्वी होते. त्यामुळे या विषयावर प्रबोधन करण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्रात 2कोटी 40 लाख तंबाखू जन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचे त्यानी सांगितले.पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी गुटखविक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासन यापुढे लक्ष ठेवणार असल्याचे सांगून कायद्याचे पालन करावे असे सांगितले. विक्रेत्यांच्या वतीने अन्वर अहमद यांनी मनोगत व्यक्त केले आणि गुटखाबंदी ला सर्व विक्रेते पूर्ण सहकार्य करतील असे आश्वासन दिले. अध्यक्ष श्रीनिवास रेणूकदास यांनी सूत्रसंचालन केले व कार्यक्रमागची भूमिका स्पष्ट केली. या वेळी हेमंत आवारी,संजय शिंदे,रमेश खरबस, नंदकुमार मंडलिक,रामलाल हासे, आबासाहेब मंडलिक, बाळासाहेब मालूंजकर,ग्राहक मंच चे.अध्यक्ष मछिंद्र मंडलिक, दत्ता शेणकर,दारुबंदी आंदोलनाचे जालिंदर बोडखे व इतर मान्यवर उपस्थित होते.बाळासाहेब मेहेत्रे यांनी आभार मानले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More