विकिलीक्सच्या असांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या असांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श क्राउन जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला असांजे इक्‍वाडोरमध्ये शरणागती पत्करून ब्रिटनच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 महिन्यांची शिक्षा भोगत आहे.

अमेरिकेने सरकारी संगणक हँक करण्याचा आरोप असांजेवर लावला आहे. काल प्रसारित केलेला दावा 2010 मध्ये विकिलीक्समध्ये प्रकाशित केलेल्या मुद्दांसंबंधी होता. त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे की, त्याने चुकीच्या पद्धतीने त्या व्यक्‍तींच्या नावाचा खुलासा केला आहे जे अमेरिकेच्या सरकारमध्ये काम करत होते. असे केल्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात आले. असांजेवरचे हे आरोप सिद्ध झाल्यावर त्याला गुप्‍त माहिती अधिनियामांतर्गत 170 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तर कमीत कमी शिक्षा 10 वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो. दरम्यान, असांजने लंडनच्या इक्‍वाडोरच्या दूतावासात सात वर्ष काढली होती. तेथे त्याने 2012 मध्ये शरणागती पत्करली होती. अमेरिका, ब्रिटन आणि स्वीडन या तीन देशांच्या कचाट्यात असांजे सापडला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More