विकिलिक्सचा प्रमुख जुलियन असांजे गंभीर आजारी! दूतावासही सोडण्यास सांगितले – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलिक्सचा प्रमुख जुलियन असांजे गंभीर आजारी! दूतावासही सोडण्यास सांगितले

लंडन – व्हिएतनाम लढाई आणि इतर घटनांवरील स्फोटक गुप्त माहिती उघड करून अमेरिकन सरकारला अडचणीत आणणारा विकिलिक्सचा प्रमुख जुलियन असांजे हा गंभीर आजारी आहे. त्यातच ज्या इक्वेडोरच्या लंडनमधील दूतावासात त्याने आश्रय घेतला आहे, त्या दूतावासाने त्याला दूतवास सोडण्यास सांगितले आहे. त्यामुळे जनतेला सत्य समजावे यासाठी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या विरोधात गेलेल्या असांजेचे पुढे काय होईल याची चिंता निर्माण झाली आहे.

अमेरिकेची संरक्षणासंबंधीची गुप्त माहिती ‘जनहितार्थ’ उघड करणार्‍या असांजेला अमेरिकेने दोषी ठरविल्यावर तो जीवाच्या भीतीने इंग्लंडला पळाला आणि त्याने आश्रय मागितला. मात्र त्याला आश्रय तर दिला नाहीच, उलट त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याची कोठडीत रवानगी करण्याचे कारस्थान रचण्यात आले. अखेर इक्वेडोर यासारख्या छोट्या देशाने त्याला राजाश्रय दिला. जुलियन असांजे लंडन शहरातील इक्वेडोअर राज्याच्या दूतवासाच्या इमारतीत गेले 2230 दिवस राहतो आहे. मात्र या काळात त्याची प्रकृती बिघडत गेली आणि तो गंभीर आजारी आहे. त्याच्या जीवाला धोका असल्याने सूर्यप्रकाश येत नाही अशा खिडक्या नसलेल्या बंद खोलीत तो इतके दिवस एकट्याने राहिला असून त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती खालावली आहे.

इक्वेडॉर दूतवासाने निवेदनात म्हटले की, असांजेला आम्ही अधिक काळ आश्रय देऊ शकत नाही. त्याला दूतावास सोडावा लागेल आणि बाहेर पडून उपचार घ्यावा लागेल. कारण त्याची प्रकृती खालावत आहे. त्याने दूतावास सोडल्यावरही आम्ही त्याला संरक्षण देऊ. पण हे संरक्षण पुरेसे ठरेल याची आम्हाला खात्री नाही. अमेरिकेच्या युद्धनीतीचा खरा चेहरा जगापुढे आणणारा जुलियन असांजे खरोखरच अडचणीत सापडला आहे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

नागपुरात उच्चशिक्षित डॉक्टरची कुटुंबियांसह आत्महत्या

नागपूर – नागपुरात आज सकाळी सर्वांना धक्का देणारी भीषण दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरमधील डॉक्टर धीरज राणे त्यांची पत्नी सुषमा राणे, त्यांचा अकरा वर्षाचा...
Read More
post-image
न्यायालय महाराष्ट्र

मराठा आरक्षण हे केंद्राच्या आर्थिक आरक्षणासोबत पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ऐकले जावे

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 25 ऑगस्टला आणि नंतर सप्टेंबर महिन्यात रितसर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते ॲड. विनोद पाटील...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र राजकीय

खा. नवनीत राणा यांना पुन्हा कोरोना! पालिकेने केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना नुकताच मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र डिस्चार्ज दिल्यानंतर...
Read More
post-image
देश शिक्षण

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरील युक्तिवाद आणखी ३ दिवस चालणार

नवी दिल्ली – देशभरातील विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सर्वच राज्यांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी ‘ड्रीम ११’ कंपनी २२२ कोटी मोजणार

नवी दिल्ली – यंदा यूएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतीक्षित आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला असून ‘ड्रीम ११’ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. त्यासाठी ‘ड्रीम ११’...
Read More