वाहने भाडे करारावर पैश्याचे प्रलोभन…. पैसे आणि वाहनेही गेली.. – eNavakal
News गुन्हे महाराष्ट्र मुंबई

वाहने भाडे करारावर पैश्याचे प्रलोभन…. पैसे आणि वाहनेही गेली..

डोंबिवली – कल्याण डोंबिवली शहरात खासगी चारचाकी वाहने भाड्याने  करारावर कंपन्यांना देऊन चांगले उत्पन्न मिळण्याचे प्रलोभन दाखवून
गाड्या चोरून केलेल्या फसवणुकीच्या दोन घटना उधडकीस आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तिघा जणां विरोधात गुन्हे दाखल केले असून अद्याप एकालाही अटक करण्यात आली नाही.

पहिल्या घटनेत डोंबिवली पूर्वेतील जिजाईनगर येथे राहणारे सतीश पवार (40) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी शनिवारी दुपारी काळूराम मलिक आणि रवींद्र पागारे या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी आपला विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्या मालकीची इन्होवा कार दर दिवशी 1200 गाडी भाडे, इंधन खर्च, ड्रायव्हरचा पगार कंपनी देणार असल्याचे प्रलोभन दाखवून  ही कार घेऊन गेले. तसेच शहापूरच्या ईतेह वाडकर यांची शेव्हरलेट कार आणि डोंबिवलीतील न्यू आयरे रोड येथे राहणारे किरण मुढे यांची ईंडीगो कार विश्वास संपादन करून घेऊन गेले. या तिन्ही कारची किंमत एकूण 15 लाख रुपयांची आहे.अशी फसवणूक केल्याचे सतीश पवार यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

दुसऱ्या घटनेत नेतिवली येथील ओंकारनगर येथील राहणारे हेमंत साळुंके (33) यांच्या तक्रारीवरुन ठाण्याच्या किसन नगर भागात राहणारा बी. मुथ्थुकुमार दुराजराज याच्या विरोधात शनिवारी दुपारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बी. मुथ्थुकुमार याने त्याचे एका मोबाईल कंपनीत पैसे बाकी आहेत असे सांगितले. मी तुमची गाडी कंपनीला दाखवून माझे पैसे वसूल करून घेतो व तुमची गाडी तुम्हाला परत देतो असा विश्वास संपादन करून 4 लाख रुपये किमतीची शेव्हरलेट कार घेऊन पसार झाला. मात्र  गाडी परत दिली नसल्याचे हेमंत साळुंके यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More