वाहनचोरीप्रकरणी २ रेकॉर्डवरील आरोपींना अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

वाहनचोरीप्रकरणी २ रेकॉर्डवरील आरोपींना अटक

मुंबई – शहरात पार्क केलेल्या दुचाकी वाहनांची चोरी करुन विक्री करणार्‍या दोन रेकॉर्डवरील आरोपींना भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी सहा दुचाकी वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एक चोरीची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. गणी ऊर्फ रशीद नासिर अन्सारी आणि सर्फराज उस्मान गणी मंसुरी अशी या दोघांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांत भायखळा आणि आसपासच्या परिसरात दुचाकी वाहनांच्या चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच शनिवारी गणी अन्सारी आणि सरफराज मंसुरी या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी सहा दुचाकी वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी काही वाहनांची विक्री केली तर काहींचे सुट्टे भाग काढल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चोरी केलेली एक मोटारसायकल आणि काही सुट्टे भाग जप्त केले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

मोबाईलसाठी दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बुलढाणा – मोबाईल फोन घेऊन दिला नाही, या क्षुल्लक कारणावरून एका दहावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. खामगाव तालुक्यातील पिंप्राळा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोकणातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी – दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याची शक्यता वर्तविली जात असल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसही सतर्क झाले असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवादी आदिलचा व्हिडिओ बनावट; पाकिस्तानी लष्कराच्या उलट्या बोंबा

रावळपिंडी – पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानची भूमिका मांडण्यासाठी आज तेथील लष्कराने पत्रकार परिषद घेतली. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हात वर...
Read More