नवी मुंबई – वाशीच्या खाडीपुलाजवळ मानखुर्दच्या हद्दीत पादचारी पुलाचे काम सुरू असताना पूल पडून क्रेनही कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीविहानी झाली नाही. मात्र यामुळे सायन-पनवेल मार्गावरील मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलाच्या पुढे मुंबईकडील भागात पादचारी पुल बांधण्यात आला होता.
वाशी टोल नाका बंद झाल्यांनतर या पुलाचा वापर बंद झाला होता. दोन वर्षापूर्वी एका ट्रकने देखील या पादचारी पुलाला धडक दिली होती. त्यावेळी पुलाचा एका बाजूचा भाग काढण्यात आला होता. यामुळे पुलाचा एका बाजुला राहिलेला भाग आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात येत होता. यावेळी क्रेनच्या सहाय्याने पूल काढत असताना क्रेनवरच पूल कोसळला. यामुळे वाशीकडून मुंबईकडे जाणार्या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.
Thane: Part of a foot overbridge collapsed near Vashi Police Naka earlier this evening. No casualties have been reported yet. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/HEXUj8qyVk
— ANI (@ANI) October 7, 2018