ऑस्ट्रेलियाचा पकिस्तानवर 41 धावांनी विजय – eNavakal
News क्रीडा विदेश

ऑस्ट्रेलियाचा पकिस्तानवर 41 धावांनी विजय

लंडन-विश्वचषक क्रिकेट स्पर्धेेत पाकिस्तान- ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने 41 धावांनी विजय मिळवून स्पर्धेतील आपल्या तिसर्‍या विजयाची नोंद केली. विजयासाठी पाकिस्तानसमोर 308 धावांचे लक्ष्य होते. पण त्यांचा डाव 266 धावांतच आटोपला. या स्पर्धेत पाकिस्तानला दुसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. शतकी खेळी करणारा वॉर्नर सामनावीर ठरला.

त्याअगोेदर ऑस्ट्रेलियाचा सलामीवर डेविड वॉर्नरने काढलेल्या दमदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने विजयासाठी पाकिस्तानसमोर 308 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 2 बाद 189 धावा अशा सुस्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाची नंतर मात्र दाणादाण उडाली. त्यांचे राहिलेले 8 फलंदाज 118 धावांतच माघारी परतले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने अवघ्या 30 धावांत 5 बळी घेऊन पाकिस्तानला या सामन्यात पुन्हा जोरदार कमबॅक करून दिले.
वॉर्नरची बंदी उठल्यानंतर त्याचे आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिलेच शतक होते. त्याने 111 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार मारून 107 धावा ठोकल्या. तर सलामीवीर कर्णधार फिंचने 84 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी करून 82 धावा कुटल्या. त्याने वॉर्नरसोबत 146 धावांची जोरदार सलामी ऑस्ट्रेलियाला करून दिली. पण या चांगल्या सलामीचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या नंतरच्या फलंदाजांना घेता आला नाही. त्यांचे इतर फलंदाज मोठी धावसंख्या काढण्यात साफ अपयशी ठरले. माजी कर्णधार स्मिथ 10, मॅक्सवेल 20, मार्श 23, खाज्वा 18 आणि कॅरी 20 धावा काढून झटपट माघारी परतले. आमीरने सुरेख गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठी धावसंख्या करू दिली नाही. त्याचा सहकारी आफ्रिदीने 2 बळी टिपले तर हसन अली, वहाब रियाझ, मोहम्मद हफिजने प्रत्येकी 1 बळी घेतला.
पाकिस्तानचा डाव 45.4 षटकांत 266 धावांतच संपला. सलामीवीर हक 53, हाफिज 46, कर्णधार अहमद 40 आणि रियाझ 45 धावा यांनी दमदार फलंदाजी करून पाकिस्तानच्या विजयायासाठी जोरदार प्रयत्न केले. पण ते शेवटी अपुरेच ठरले. ऑस्ट्रेलियातर्फे कमिन्सने 3 तर स्टार्क, रिचर्सनने प्रत्येकी 2 बळी घेतले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More