वायू चक्रीवादळाचा फटका! मुंबईत मान्सून ७ दिवस लांबणीवर – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

वायू चक्रीवादळाचा फटका! मुंबईत मान्सून ७ दिवस लांबणीवर

मुंबई – अरबी समुद्रात घोंगावणारे ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातला न धडकता अखेर अरबी समुद्रात गडप झाले. परंतु या वादळाचा फटका मात्र मान्सूनच्या आगमनाला बसला आहे. या वादळाने वातावरणातील आर्द्रता खेचल्याने मान्सून आगमनाची शक्यता खुंटली असून मुंबईत मान्सूनचे आगमन सात दिवस लांबणीवर पडले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या २० जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होईल आणि  पुढील दिवसांत राज्यभरात सक्रीय होईल.

दरम्यान, समुद्रातील तुफान, वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे गुजरातच्या वेरावळ, दीव, गीर, जुनागड, द्वारका, मांगरोण, पोरबंदर, कांडला, राजकोट, केशोड, भावनगर, मलंग आदी कच्छ व सौराष्ट्र भागातील जीवन अस्ताव्यस्त झाले. येत्या 15 जूनपर्यंत या भागात अतिमुसळधार पावसाचा धोका कायम आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा मुंबईत दाखल; गोरेगावमध्ये सभेचे आयोजन

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यासोबतच आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More
post-image
देश

भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

नवी दिल्ली – आज ‘लँडर विक्रम’च्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस होता. मात्र लँडर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही. उरली सुरली आशा संपल्यावर इस्त्रो’चे प्रमुख डॉ....
Read More