वानखेडे स्टेडियमवर आज टी-२० मालिकेचा शेवटचा थरार – eNavakal
क्रीडा मुंबई

वानखेडे स्टेडियमवर आज टी-२० मालिकेचा शेवटचा थरार

मुंबई – टीम इंडिया आज भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने उतरेल. मात्र, सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला कर्णधार रोहित शर्मा घरच्या मैदानावर कोणता पराक्रम करणार, यावर सर्व भारतीयांचे लक्ष असेल. तर तिस-या टी-२० मध्ये टीम इंडियात तरूणांना संधी मिळू शकते.

कटक आणि इंदूर येथे सलग दोन टी-२० सामने जिंकून भारताने आधीच तीन सामन्यांच्या मालिकेत २-० असा कब्जा केला आहे. आज टीम इंडिया श्रीलंके विरूद्ध तिस-या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेला व्हाइटवॉश देण्यासाठीच मैदानात उतरेल. रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या असे एकाहून एक सरस भारताच्या फलंदाजीला रोखण्याचे मुख्य आव्हान श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे असेल. वानखेडेची खेळपट्टी मोठ्या धावसंख्येसाठी ओळखली जात असली, तरी येथे अनेकदा गोलंदाजांचेही वर्चस्व पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे मालिकेतील उरलीसुरली प्रतिष्ठा जपण्यासाठी श्रीलंकेचा संघाला नवी शक्कल लढवावी लाईल.

दरम्यान, एकीकडे टीम इंडियाने सर्वच बाजूने चांगलं प्रदर्शन करून दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी आणखी एक सामना जिंकून त्यांना आत्मविश्वास वाढवायचा आहे. तर श्रीलंकेसाठी हा दौरा निराशाजनकच राहिला. टीम इंडियाने कटकमधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ९३ रन्सने मात दिली. त्यानंतर इंदोर येथील दुसरा सामना ८८ रन्सने जिंकत सीरिज नावावर केली. याआधी वनडेमध्ये श्रीलंकेला १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. तर टेस्टमध्येही श्रीलंकेला चांगला फटका बसला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More