वादळी वाऱ्यासह पावसाने नांदेडला झोडपले – eNavakal
पर्यावरण महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शेती

वादळी वाऱ्यासह पावसाने नांदेडला झोडपले

नांदेड –  जिल्ह्यातील पार्डी परिसरात रात्री अचानक विजांच्या कडकडाटांसह, सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने हाहाकार माजविला असून घरांवरील पत्रे उडून परिसरातील केळी, गहू, हळद, ज्वारी, पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. पार्डी परिसरातील शेणी, कारवाडी, निमगाव, चिंचबन परिसरातील रात्री विजांच्या कडकडाटांसह वादळी वा-यासह अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे़.

अगोदरच पाण्याच्या कमतरतेमुळे केळीची लागवड कमी झाली होती. काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केळीच्या बागा जोपासल्या होत्या. मात्र वादळी वा-यामुळे केळीच्या बागाचे मोठे नुकसान झाले असून शेतक-यांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे़. अचानक झालेल्या या अस्मानी संकटाने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे़ तसेच अचानक आलेल्या संकटाने शेतक-यांची एकच धावपळ होऊन मोठी तारांबळ उडाली.

सध्या पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर परराज्यातील मजूरदार हळद कामानिमित्ताने पार्डी परिसरात आले असून त्याचा शेतातच मुक्काम असल्याने रात्री आलेल्या वादळी वा-याचा फटका बसला. त्याच्या राहण्याचे पाल वादळी वा-यात उडून गेले होते.त्यामुळे त्याची मोठी तारांबळ उडाली. तसेच शेतात असलेल्या गायी, म्हशी, बैल आदी जनावरे किरकोळ जखमी झाले आहेत.

शेतातील आखाडे पूर्णत: उद्ध्वस्त झाले असून  मजुरांना याचा मोठा फटका बसला आहे़ अर्धापूर तालुक्यातील पार्डी परिसरातील चिंचबन भागातील केळीच्या बागावर मोठा परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणावर गहू आडवा पडला असून ज्वारीच्या पिकाला वादळी वा-याचा फटका बसला आहे. आंब्याचे नुकसान झाले असून टरबुजाच्या मळ्याना वादळी वा-याचा फटका बसला आहे. तसेच नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गापासून तीन किमी अंतरावरील शेणी गावाच्या रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड पडल्याने हा मार्ग वाहतुकासाठी बंद झाला होता.

परराज्यातील मजूरदार हळदीच्या कामानिमित्ताने पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर आलेले असून त्यांचा रानात मुक्काम असल्याने रात्री अचानक आलेल्या वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावण्याने त्याची एकच तारांबळ उडाली होती़ पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणात हळद काढणी व शिजवण्याचे काम सुरू असल्याने शेतकरी व मजूरदार रात्री शेतातच मुकामास असल्याने अचानक आलेल्या वादळी वा-यामुळे एकच धांदल उडाली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More
post-image
देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा मध्यस्थीची तयारी दाखवली

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तानात मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. जर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही...
Read More