वादग्रस्त ‘एस दुर्गा’चा मार्ग मोकळा – eNavakal
देश मनोरंजन

वादग्रस्त ‘एस दुर्गा’चा मार्ग मोकळा

पणजी – सेक्सी दुर्गा या मल्याळम चित्रपटाचे नाव बदलून एस दुर्गा असे करूनही हा चित्रपट 2017 मध्ये गोव्यात झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  (इफ्फी)  प्रदर्शित करण्यास नकार देण्यात आला होता. त्याविरोधात मोठे वादंग उठले होते. परंतु आता सेन्सॉर बोर्डाच्या फेरआढावा समितीने या चित्रपटाला कोणतीही कात्री न लावता संमती दिली आहे. त्यामुळे इफ्फीच्या आयोजकांना ही मोठी चपराक समजली जात आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शक सनल कुमार शशिधरण यांनी सांगितले की, आता हा चित्रपट लोकांना पाहण्यासाठी खुला झाला आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे ‘यू/ए’ प्रमाणपत्र मिळाले असून, या निर्णयामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. शिवाय आता हा चित्रपट प्रदर्शनास अजिबात वेळ घालविला जाणार नाही. या चित्रपटामध्ये काहीही आक्षेपार्ह नसून, आता या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टरही शशिधरण यांनी ट्विटरवर अपलोड केले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More