वाढदिवसाच्या शुभेच्छांएेवजी अजयवर नेटकऱ्यांकडून टीकांचा वर्षाव – eNavakal
मनोरंजन मुंबई

वाढदिवसाच्या शुभेच्छांएेवजी अजयवर नेटकऱ्यांकडून टीकांचा वर्षाव

मुंबई – अभिनेता अजय देवगण पॅरिसमध्ये कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काल अजयने  कुटुंबीयांसमवेत आपला 49वा वाढदिवस साजरा केला. इन्स्टाग्रामवर अजयने काही फोटो पोस्ट केले आहेत. पण या फोटोवर वाढदिवसाच्या शुभेच्छांऐवजी नेटकऱ्यांची टीकाचं सर्वाधिक पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी अजयला चांगलेचं धारेवर धरले आहे. अजयने   पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तो त्याच्या ७ वर्षीय मुलासोबत उभा असून सिगारेट ओढताना पाहायला मिळत आहे. यावरूनच सार्वजनिक ठिकाणी लहान मुलासमोर धुम्रपान करणं कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

Before & After.

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

तू अनेकांसाठी आदर्श आहेस. अशावेळी लहान मुलांसमोर धुम्रपान करून तू कोणता आदर्श लोकांसमोर ठेवत आहेस, असा प्रश्न एका नेटकऱ्याने  केला आहे. तर अशा वागणुकीमुळे सेलिब्रिटी इतरांसमोर चुकीचं उदाहरण ठेवत आहेत, असं एकाने म्हटलं.  नेटकऱ्यांच्या या टीकांवर आता अजय काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More