वाढदिवशी आमिर खानकडून आगामी सिनेमाची घोषणा – eNavakal
देश मनोरंजन

वाढदिवशी आमिर खानकडून आगामी सिनेमाची घोषणा

मुंबई – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने वाढदिवशी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे. आमिरने त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर नव्या सिनेमाची घोषणा केली. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ दणकून आपटल्या नंतर आता आमिर लवकरच ऑस्कर विजेत्या सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे.

१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ सिनेमाने ऑस्कर जिंकला होता. याच सिनेमाच्या रिमेकमध्ये आमिर झळकणार आहे. आणखी एक खास सरप्राईज म्हणजे, यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमासाठी आमिरला तब्बल २० किलो वजन कमी करायचे आहे. अद्वेत चंदन या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. अद्वेतने याआधी ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मीडियाच्या माध्यमातून आमिरने त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More