वाड्यात २४ कुंडीय गायत्री महायज्ञ संपन्न – eNavakal
उपक्रम महाराष्ट्र

वाड्यात २४ कुंडीय गायत्री महायज्ञ संपन्न

वाडा- गायत्री परिवार, वाडाच्या वतीने शुक्रवार ते रविवार दरम्यान २४ कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.  या तीन दिवस झालेल्या धार्मिक कार्यक्रमात प्रबोधन, मार्गदर्शन व संस्कार विषयक कार्यक्रम, ध्यान, प्राणायाम, योगासने, ५ ते १४ वयोगटातील मुलांसाठी विद्यारंभ संस्कार व समाजातील विशेष काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला.

परमार्थाच्या प्राप्तीसाठी केला जाणारा सर्वोत्तम पुरुषार्थ म्हणजे यज्ञ. या उक्ती प्रमाणे यज्ञ हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. मानवी जीवनात पुंसवन संस्कारापासून अंत्येष्टी संस्कारापर्यंत प्रत्येकाशी यज्ञमय अग्नी संस्कार जोडलेला आहे. यज्ञ म्हणजे जगाच्या कल्याणासाठी केला जाणारा आत्मत्याग होय. कलियुगात संस्कार लोप पावल्याने अनेक समस्या उद्भवल्या आहेत. आजच्या काळात प्रदुषण निवारण, आपत्ती व्यवस्थापन, संस्कार पुनरुज्जीवन, स्वास्थसंवर्धन यामध्ये यज्ञाची महत्वपूर्ण भूमिका आधुनिक वैज्ञानिकांनी सिद्ध केली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे गायत्री परिवार वाडाच्या वतीने सांगण्यात आले. वाडा शहरातील गायत्री नगर येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रेद्वारे करण्यात आली. यावेळी कलश डोक्यावर घेऊन १०८ सुवासिनींसह असंख्य महिला, नागरिक व गायत्री परिवाराचे सदस्य सहभागी झाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More