वाड्यातील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटेना; नागरिकांचे आरोग्य धोक्यात – eNavakal
महाराष्ट्र

वाड्यातील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटेना; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाडा – ४० हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या वाडा शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाडा नगरपंचायतीकडे मालकीची कुठलीच जागा नाही आहे. त्यामुळे येथील सर्व कचरा वाडा-भिवंडी या राज्य महामार्गावर वाडा शहराच्या प्रवेशद्वारावरच टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे या परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वाडा शहराच्या प्रवेशद्वारालाच नगरपंचायतीने डंपिंग ग्राऊंड बनविल्याने नगरपंचायत प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या डंपिंग ग्राऊंड शेजारी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांचे निवासस्थान आहे. या डंपिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमुळे होणाऱ्या त्रासाबाबत अनेकांनी पालकमंत्री, नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.
वाडा-भिवंडी या राज्य महामार्गावर असलेल्या डंपिंग ग्राऊंडचा कचरा रस्त्यावर पसरत असलेल्या या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत. तसेच या डंपिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. या मोकाट जनावरांमध्ये होत असलेल्या झुंजीमुळे व अंधारात त्यांच्या धडकीने अनेक मोटार सायकल स्वारांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.

वाडा शहर लगत वनखात्याच्या मोठ्या प्रमाणावर जमीनी आहेत. या जागा महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन येथील डंपिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी येथील अनेक सेवाभावी संस्थांनी येथील लोकप्रतिनिधींकडे अनेकदा केली आहे. मात्र त्याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने येथील नागरिकांना या डंपिंग ग्राउंडच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More