वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर – eNavakal
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन 13 कोटी रुपयांचा निधी वाडिया रुग्णालयाला तातडीने देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. गत काही दिवसांपासून वाडिया रुग्णालयाला पालिकेने आर्थिक मदत केली नसल्याचा मुद्दा चर्चेत असल्यामुळे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी महापौरांना पत्र देऊन बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौरांनी आज बैठक घेऊन यशस्वी तोडगा काढला. पालिका वाडिया रुग्णालयाला 50 टक्के आर्थिक निधी देत असते. गत काही दिवसापासून हा निधी महापालिकेकडून प्राप्त झाला नसल्याने रुग्णसेवा तसेच कर्मचार्‍यांचा पगार खोळंबण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. याबाबत महापौरांनी काही दिवसांआधी वाडिया रुग्णालयाला भेट देऊन तेथील प्रशासनासोबत बैठक घेऊन सद्यस्थिती जाणून घेतली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आरोग्य ट्रेंडिंग तंत्रज्ञान

कारणाशिवाय नको कोणत्यातरी कारणासाठी चालत राहा, सर्वेक्षणातून महत्त्वाची बाब समोर

सदृढ शरीरासाठी चालणं हा सर्वांत उत्तम व्यायाम आहे असं म्हटलं जातं. त्यासाठी अनेक फिटनेस फ्रिक रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करतात. रोज नियमित अर्धा तास...
Read More
post-image
महाराष्ट्र

ऑनलाइन मेळाव्यात राज्यभरातून सुमारे एक लाख महिला सहभागी

मुंबई – महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनास ॲमेझॉनद्वारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना काळात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांची तहान भागली! सात धरणांमध्ये नऊ महिने पुरेल इतका पाणीसाठा

मुंबई – धरणात मुबलक पाणीसाठा नसल्याने ऐनपावसाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांनी तहान भागवणारे...
Read More
post-image
मनोरंजन

‘मी बाप्पा बोलतोय’ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – सध्या सगळ्यांना वेध लागलेत ते गणरायाच्या आगमनाचे. बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर असणाऱ्या गणेशभक्तांना  यंदाच्या गणेशोत्सवात खास बाप्पावर असलेल्या एका लघुपटाची मेजवानी मिळणार आहे. भावेश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली – भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (73) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून ते कोरोनाशी झुंज देत होते. अखेर आज...
Read More