वाघ, सिंह तुमच्याही घरात आलेत का? गुगलचं ‘हे’ फिचर वापरून पाहा! – eNavakal
ट्रेंडिंग

वाघ, सिंह तुमच्याही घरात आलेत का? गुगलचं ‘हे’ फिचर वापरून पाहा!

कोरोना, लॉकडाउन आणि सोशल मीडिया सध्या याच गोष्टी कानावर पडत आहेत. त्यातही अनेकजण सकारात्क आणि मजेशीर गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सोशल मीडियावर काही जुन्या तर काही नव्या गोष्टी ट्रेंड होत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत ती गोष्टी  देखील सध्या ट्रेंडमध्ये आहे. विशेषकरून लहान मुलांसाठी हि एक मस्तच गंमत आहे. तुमच्या घरी सिंह, पेंग्विन, पांडा हे प्राणी दिसताय का? आता अनेकांना हा प्रश्न थोडा विचित्र वाटला असेल. पण हा प्रश्न अगदी बरोबर असून त्याच उत्तर देखील तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

३D प्राण्यांचा अनुभव 

Google source

गुगलवर तसं सर्वच सापडतं. तसंच हे थ्रीडी प्राणी देखील तुम्हाला सापडणार आहेत. गुगलच्या ३D ऍनिमल फीचरच्या माध्यमातून तुम्हाला हा अनुभव घेता येणार आहे. ३D स्वरूपातून प्राणी चक्क तुमच्या आसपास असल्याचा अनुभव तुम्हाला घेता येणार आहे. या प्रकाराला Augmented reality असं म्हणतात. खऱ्या आयुष्यातील गोष्टींना कम्प्युटरद्वारे नवा टच देत सादर केलं जातं. या प्रकारात एखादी गोष्ट समोर उभी राहते शिवाय त्याला आवाजही जोडता येतो. सध्या अ‍ॅपल या आणि अँड्रॉइड फोनवर हे फिचर उपलब्ध आहे.

महत्त्वाचं म्हणजे गुगलचं हे फिचर एक वर्षांपूर्वीच आलं आहे. मात्र सध्या लॉकडाउनच्या काळात अनेक जुन्या गोष्टी ट्रेंड होतायत त्यात या फिचरचाही समावेश आहे. विशेष करून घरी असलेल्या लहान मुलांसाठी एक मनोरंजन म्हणून गुगलची हि गंमत नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल.

Google source

३D फिचर कसं वापराल?

महत्त्वाचं म्हणजे हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला आधी गुगलवर जावं लागले.  त्यानंतर तुम्हाला एखादा प्राणी सर्च करायचा आहे.

उदा. तुम्ही सिंह सर्च केल्यावर त्याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर येईल. त्यानंतर थोडं खाली स्क्रोल केल्यावर View in ३D हा पर्याय तुम्हाला दिसेल. यावर क्लिक करा.

या पर्यायावर क्लिक केल्यावर ३D रूपातील प्राणी तुमच्या समोर येईल. तसंच view in your place हा पर्याय क्लिक केल्यावर तुमचा कॅमेरा ऑन होईल आणि हा प्राणी तुम्हाला तुमच्या घरात असल्याचं दिसले.

हीच गंमत तुम्हाला तुमच्या लहान मुलांना देखील दाखवयाची आहे. यासोबत तुम्ही फोटो देखील काढू शकता. यात आणखी एक गोष्ट म्हणजे काही निवडक प्राणीच तुम्हाला ३D रूपात दिसतील हे प्राणी कोणते ते जाणून घेऊ.

Google source

३D प्राण्यांची यादी 

मांजर, कुत्रा

चित्ता, बदक

गरुड, पेंग्विन

पांडा, बकरी

सिंह, घोडा

ऑकटोप्स, शार्क

साप, वाघ

कासव, लांडगा

Labrador Retriever,  Shetland pony, Racoon, Macaw, Hedgehog, Rottweiler, Pug, Angler fish, Brown bear

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन माश्याच्या मृत्यूची संख्या वाढली

रत्नागिरी – कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर

सोलापूर – सोलापुरात आज कोरोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ५९ झाली आहे. तर एकूण...
Read More
post-image
विदेश

अमेरिकन कंपनीकडून कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरू

कॅनबरा – कोरोना व्हायरसचा जगभर कहर सुरू असताना आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे. एका अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीने यावर लस शोधली आहे. या...
Read More
post-image
देश मुंबई

मुंबई शेअर बाजारात तेजी

मुंबई – जगभरातील शेअर मार्केटमधून आलेल्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारातही आज सकाळी तेजीचे वातावरण होते. सकाळी तेजीत उघडलेल्या बाजारात निफ्टी ९,१००च्या वर ओपन झाला,...
Read More
post-image
महाराष्ट्र

आता ठाण्यात पोलिसांच्या मदतीला रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स

ठाणे – ठाण्यात पोलिसांच्या मदतीला आता रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट आणि कळवा-मुंब्रा परिमंडळात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत...
Read More