वाकडच्या काळखडक परिसरात गुंडांचा धुडगुस – eNavakal
महाराष्ट्र

वाकडच्या काळखडक परिसरात गुंडांचा धुडगुस

वाकड – वाकडच्या काळखडक येथे २० ते २५ जणांच्या टोळक्याने जुन्या वादातून खुन्नस काढण्यासाठी दिसेल त्याला मारहाण आणि वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तलावारी, कोयते आणि काठया घेऊन आलेल्या टोळक्यांनी झोपडपट्टीतल्या घरात घुसून वस्तूंची नासधूस केली. ही घटना २५ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या तोडफोडीत  आठ दुचाकीेंचे नुकसान झाले. तसेच रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना मारहाण केल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More