वांद्रे स्कायवॉक 31 डिसेंबरपर्यंत खुला होणार! मुंबई पालिकेची उच्च न्यायालयात ग्वाही – eNavakal
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक 31 डिसेंबरपर्यंत खुला होणार! मुंबई पालिकेची उच्च न्यायालयात ग्वाही

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या वांद्रे स्थानकातील स्काय वॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आल्यानंतर त्याची डागडुजी करून 31 डिसेबरपर्यंत खुला करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेने आज उच्च न्यायालयात दिली.
वांद्रे स्थानकापासून कलानगर येथे जाण्यासाठी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करु नये यासाठी स्काय वॉक बांधण्यात आला. मात्र काही कारणास्तव हा स्काय वॉक एमएमआरडीएने बंद केला. हा स्काय वॉक बंद ठेवण्यात आल्याने लाखो पादचार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तो पुन्हा सुरू करण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका वांद्रे येथील रहिवासी के.पी.पी. नायर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करून या स्काय वॉकची व्हिजेटिआयने पाहणी केली. 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिटचे काम पूर्ण होणार असून 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर स्कायवॉकची डागडूजी करून तो 31 डिसेंबरपर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

स्काय वॉक बंद ठेवणे योग्य
या स्काय वॉकची व्हीजेटीआयमार्फत प्राथमिक पाहणी करण्यात आली. तूर्त तो वापरण्या योग्य नाही. त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्यानंतर अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत हा पूल बंद ठेवण्याची गरज असल्याची माहिती व्हीजेटीआयच्यावतीने न्यायालयात देण्यात आली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More