वांद्रे शासकीय वसाहतीत पुन्हा छत कोसळलं – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

वांद्रे शासकीय वसाहतीत पुन्हा छत कोसळलं

मुंबई – गुरुवारी पहाटे वांद्रे येथे शासकीय वसाहतमध्ये इमारत क्रमांक २९५/5 या इमारतीतील दुसऱ्या माळ्यावर छताचे स्लॅब अंगावर कोसळल्याने आई व मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. तर याच दिवशी रात्री ९ वाजता याच वसाहतीत इमारत क्रमांक २७०च्या दुसऱ्या माजल्यावरील घराच्या छताचं प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे शासकीय वसाहतीतील इमारतींची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे.

गुरुवारी या घटनेनंतर शासकीय वसाहतीतील रहिवासी संतप्त झाले असून मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पी.डब्ल्यू.डी.) कार्यालयाला घेराव घालण्यात आला. शासकीय वसाहतीतील रहिवाशांना निश्चिंत राहण्याचे वचन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ जूलै रोजी कम्युनिटी हॉल येथे घेतलेल्या बैठकीमध्ये दिले होते. तुम्हाला कोणीही धक्का लावणार नाही असे राज ठाकरे यांनी शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या पूर्नवसनाच्या प्रश्नाबाबत सांगताना सांगितले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बांदिवडेकरांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात

रत्नागिरी – ररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार्‍या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी असलेल्या वैभव राऊतला...
Read More