वसई-विरार शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद – eNavakal
News महाराष्ट्र

वसई-विरार शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद

वसई – वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन प्लांट येथील उपकरणांच्या दुरुस्तीसाठी महावितरण वीज कंपनीने आज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत शटडाऊन घेतले असल्याने आज शनिवारी शहराला सूर्याच्या नवीन व जुन्या योजनेतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात व धरणे तुडुंब भरलेली असताना देखील वसईत पाण्याची बोंब होणार आहे. या दुरुस्ती दरम्यान मासवण व धुकटन प्लांटच्या सबस्टेशनमध्येही दुरुस्तीचे काम असल्याने येथील वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
एकूणच आज दिवसभर हे दुरुस्तीचे काम सुरू होते. आता उद्या शनिवारी हे दोन्ही पंप टप्याटप्याने हळूहळू पूर्ववत करून हा पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात येईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या देश

बँक कर्मचार्‍यांचा दोन दिवसांचा संप मागे

मुंबई – बँक कर्मचार्‍यांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मेकअप बॉक्स वाटल्याप्रकरणी प्रणिती शिंदेेंच्या अडचणीत वाढ

सोलापूर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मेकअप बॉक्सचे वाटप केले असल्याचा आरोप...
Read More
post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More