वसई -विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा! यंदा द्या थांबा! – eNavakal
News महाराष्ट्र

वसई -विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा! यंदा द्या थांबा!

वसई- वसईत 9 ते 12 जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे वसई तालुक्यातील खासकरून पालिका हद्दीतील एकूणच जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच मानवनिर्मित पूरस्थिती याला कारणीभूत असल्याने यावर्षी जनतेच्या कर रूपातून जमा झालेला पैसा हा महापौर मॅरेथॉन  स्पर्धेवर अजिबात खर्च न करता तो केवळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा, असे निवेदन पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी वसई विरार महापालिकेचे आयुक्त सतिश लोखंडे यांना दिले आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण वसई तालुक्यात पूरसद्दृश परिस्थिती निर्माण झाली होती. सलग चार दिवस पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पावसाचे पाणी जमून त्यांचे संसार उघड्यावर आलेत. अनेकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. वसईकर जनता अजूनही या मानसिक धक्क्यातून सावरलेली नाही,
दरम्यान, महापालिका दरवर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महापौर मॅरेथॉनवर करोडो रुपये खर्च करीत असते. किंबहुना वसईत आताच्या घडीला अशी गंभीर समस्या उभी ठाकली असतांना महापालिकेने किमान यंदा तरी हि आंतरराष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धा घेऊ नये. त्यातच निवेदन देऊनही जर महापौर मॅरेथॉन स्पर्धा घेतली तर तो जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार ठरेल असे वसईतील पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More