वसई विरार महापालिकेत होणार बिनविरोध निवड – eNavakal
निवडणूक महाराष्ट्र

वसई विरार महापालिकेत होणार बिनविरोध निवड

वसई – वसई विरार महापालिकेच्या मागील दीड महिन्यापासून रिक्त असलेल्या परिवहन सभापती पदासाठी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया संपन्न होत आहे. त्याचे नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी बुधवार 8 ऑगस्ट ही  तारीख देण्यात आली होती, दरम्यान आधीच उशीर झालेल्या या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी वसई- विरार मधील विरोधी पक्षाकडून एक ही अर्ज मुदतीत न आल्याने केवळ सत्ताधारी बविआ पक्षकाडून एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे चित्र बुधवारी पालिकेत स्पष्ट झाले.

बविआ तर्फे विहित मुदतीत केवळ एकमेव नामनिर्देशन पत्र म्हणून प्रितेश हरेश्वर पाटील यांचाच अर्ज प्राप्त झाला असल्याची माहिती नगरसचिव संजू पाटील यांनी दिली, यावेळी पालिका मुख्यालयात परिवहन सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र भरणे करिता महापौर रुपेश जाधव,माजी महापौर नारायण मानकर,उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
एकूणच पालिकेच्या दीड महिन्याहून जास्त दिवस रिक्त असलेल्या परिवहन सभापती पदासाठी ठाणे जिल्हाधिकारी, डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली परवा सकाळी 11 .०० वाजता ही प्रक्रिया संपन्न होणार आहे. त्यामुळे प्रितेश पाटील यांचे एकच नामनिर्देशनपत्र नगरसचिवाकडे प्राप्त झाल्याने त्यांची वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सभापती पदी बिनविरोध निवड होईल केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे महापौर रुपेश जाधव यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More