वसई -विरार महापालिका परिवहन सभापतीपदी प्रितेश पाटील – eNavakal
निवडणूक महाराष्ट्र

वसई -विरार महापालिका परिवहन सभापतीपदी प्रितेश पाटील

वसई –  वसई विरार महापालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीं पदासाठी बुधवार दि.८ ऑगस्ट रोजी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती, त्यावेळी पालिकेत दुपार पर्यंत विरोधी पक्ष वगळता केवळ सत्ताधारी बविआ कडून एकच नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले होते त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते.

दरम्यान पीठासीन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी पालिकेत एकमेव अर्ज दाखल करणारे बविआ चे उमेदवार प्रितेश पाटील यांची अखेर गुरुवार दि. १० ऑगस्ट सकाळी ११ वाजता पालिकेच्या मुख्यालयात अधिकृत म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी नवनिर्वाचित सभापतीं प्रितेश पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी वसई विरार पालिकेचे उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, त्यावेळी सभागृह नेते फ्रॅंक आपटे,बविआचे नेते अजीव पाटील,माजी स्थायी सभापती नितीन राऊत,प्रवीण शेट्टी,अजय खोकाणी,आणि मावळते परिवहन सभापती धनंजय गुप्ता आदी मंडळी आवर्जून उपस्थित होती. विशेष म्हणजे बविआ च्या कार्यकर्त्यांकडून आलेल्या सूचनेनुसार एका सामान्य कार्यकर्त्याच्या निवडीमुळे आम.हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्ता हीच माझी खरी ताकद असल्याचे पुन्हा एकदा या निवडणुकीने अधोरेखित केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More