वसई क्रीडा महोत्सवाची लिम्का बुकात झेप – स्पर्धकांचा विक्रमी प्रतिसाद – eNavakal
क्रीडा मुंबई

वसई क्रीडा महोत्सवाची लिम्का बुकात झेप – स्पर्धकांचा विक्रमी प्रतिसाद

वसई  – वसई तालुका क्रीडा महोत्सवाला दणदणीत प्रतिसाद लाभत आहे. महोत्सवातील स्पर्धांमध्ये 50 हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग लाभल्यामुळे या महोत्सवाची ‘लिम्का बुका’त नोंद झालेली आहे.
भारताचा क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर, अभिनेते सचिन खेडेकर व महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन  करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, बॅडमिंटन, शरीरसौष्ठव, खो-खो, व्हॉलीबॉल, शूटिंगबॉल, कराटे, टेबल टेनिस या खेळांच्या शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. एकूण 68 क्रीडा स्पर्धांमध्ये वसईतील खेळाडू आपली चुणूक दाखवताहेत. या क्रीडा महोत्सवात यशस्वी होणार्‍या खेळाडूंवर सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे. तसेच सर्वसाधारण विजेतेपद पटकावणार्‍या शाळा व संस्थांना चॅम्पियनशिप ट्रॉफी बहाल करण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

आसाममध्ये भूकंपाच्या धक्क्याने घबराट

गुवाहटी – मुसळधार पावसामुळे पूरस्थितीत अडकलेल्या आसाममध्ये आज दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला. दुपारी २.५१ वाजता झालेल्या या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ५.९ इतकी होती....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा निवडणुका जिंकूच! आदित्य ठाकरे

धुळे – युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आहे’, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

प्रियंका गांधींचे पहिले धरणे आंदोलन! पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली – काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यासाठी निघाल्या. परंतु मिर्झापूरमध्ये त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सोनभद्रमध्ये जाण्यापासून पोलिसांनी रोखले. त्यामुळे प्रियंका यांनी मिर्झापूरमध्ये धरणे...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More