वसईरोड रेल्वे सुरक्षा बलतर्फे “जागृती अभियान संपन्न “ – eNavakal
महाराष्ट्र

वसईरोड रेल्वे सुरक्षा बलतर्फे “जागृती अभियान संपन्न “

वसई – रेल्वे स्थानकात लोकल गाडी पकडण्याच्या नादात प्रवासी एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी चक्क रेल्वेच्या रुळांचा वापर करतात, यामुळे अशा नियम न पाळणाऱ्या प्रवाश्यांचे जीव नेहमीच जात असतात. तर हा रेल्वेप्रवास सुखकर व्हावा आणि अशा प्रसंगी गर्दी टाळण्यासाठी अनेक धडधाकट प्रवासी खास करून कॉलेज विद्यार्थी थेट अपंगाच्या डब्यात प्रवेश करून प्रसंगी त्या अपंगांची गैरसोय करतात,असे आढळून आले आहे, इतकच नाही तर त्या मालवाहतूकीच्या डब्यात सुद्धा जनरल प्रवेश करून व्यापाऱ्यांना देखील त्रास देतात.

याबाबत एकूणच रेल्वे नियामा विषयी प्रवासी वर्गात “जनजागृती निर्माण “करण्यासाठी वसई तालुका पत्रकार संघ व वस रोड रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने वसई रेल्वे स्थानकाच्या फलाट.क्र. 2 व 3 येथे रेल्वे रूळ ओलांडणारे, ल गे ज च्या डब्यात प्रवास करणारे व अपंगाच्या डब्यात प्रवास करणारे प्रवासी याना पकड्ण्यात येऊन अशा प्रवाश्यांना उपस्थित संघाच्या पत्रकारांनी तसेच आर.पी.एफ च्या जवानांनी व अधिकाऱ्यांनी गुलाबाचे पुष्प देऊन त्यांना रेल्वेचे नियम समजावून सांगितले .

या समाजभिमुख अभियानाच्या वेळी वसई आर.पी.एफ चे आय.पी.एफ संतोषकुमार यादव ,पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित ,सचिव आशिष राणे, उपाध्यक्ष आनंद गदगी ,जेष्ठ पत्रकार निरंजन राऊत, पत्रकार रवी कांबळी ,अरुण सिंह ,शिवकुमार शुक्ल,प्रसाद जोशी तसेच आर.पी.एफ चे जवान प्रवीण सोया ,योगेंद्र सिंह चंन्द्रवत ,अनंत सुवारे ,श्रीमंत सांगळे व त्यांचे डझनभर सहकारी जवान याठिकाणी उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More