वसईत पालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक – eNavakal
News मुंबई

वसईत पालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक

वसई –  वसईत आज अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार्‍या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली. वसईच्या राजीवली वाग्रालपाडा परिसरात ही दगडफेक झाली. आज सकाळपासून या परिसरात वसई विरार महापालिकेची अनाधिकृत बांधकामावर तोडक कारावाई सुरू होती.  या परिसरात 10 ते 15 हजार अनधिकृत चाळी असून या अवैध बांधकामांवर महापालिकेेने बुधवारपासून कारवाईला सुरुवात केली होती. यावेळी शेकडो घरं तोडल्यानंतर स्थानिकांनी अचानक दगडफेक सुरू केली.  एक जेसीबी आणि एक गाडी स्थानिकांनी जाळली. तर आणखी एका जेसीबीची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यावेळी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. पोलिसांनी दगडफेक करणार्‍यांपैंकी काही जणांना ताब्यात घेतले. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून तेथे राहत असलेल्या लोकांच्या संतापाला पोलिसांना सामोरे जावे लागले. यामुळे, पालिका अधिकार्‍यांसमोर काम कसं करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

भाजपाच्या विजयानंतर मोदींनी अडवाणी, जोशींची घेतली भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची...
Read More