वसईत पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले गटाराचे पाणी – eNavakal
Uncategoriz महाराष्ट्र

वसईत पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले गटाराचे पाणी

वसई  – मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई शहराला पाण्याचा वेढा पडला होता.  यामुळे शहरातील बहुतांश घरे पाण्याखाली गेली होती. अनेक इमारतींमधील तळमजल्यावरील घरांमध्ये चार ते पाच फूट पाणी साचले होते. आता पाऊस थांबून सहा दिवस झाल्यामुळे परिस्थिती पूर्ववत होईल, अशी वाटत असताना . सहा दिवसानंतरही अनेक घरांमध्ये साचलेले पाणी कमी झालेले नाही. या पाण्यासोबत वाहून आलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्येच गटाराचे पाणी शिरले आहे.

वसईतील जवळपास शेकडो सोसायटयांमध्ये ही परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिक पाणी आणि वीज या सुविधांअभावी पूर्णपणे बेहाल झाले आहेत. एकूणच वसई विरार पालिकेने मान्सून पूर्व भागातील पाहणी न करता कुठल्याही प्रकारचे नियोजन न केल्याने व नालेसफाई न केल्याने आज वसईत ही करुण आणि बिकट परिस्थिती निर्माण झाली हे कोणीही नाकारणार नाही,याबाबत राज्य शासनाने वसईतील यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शनिवार आणि रविवार ही हे काम सुरू आहे, आतापर्यंत साडेतीन हजार हून अधिक लोकांना स्थलांतर करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे,

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

शासनाने अनुदानरुपाने साखर कारखान्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे

नारायणगाव – सध्या साखरेचे दर निचांकी पातळीवर खाली आलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर उपपदार्थाचेही दर कमी झाले असल्याने सर्वच साखर कारखान्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांना एफ....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सध्या ते पुण्यात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात पुण्यातील मेट्रो ३ चे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येणार...
Read More