वसईत पाचुबंदरच्या अतिक्रमणावरुन मच्छीमार संघर्ष पेटणार – eNavakal
Uncategoriz

वसईत पाचुबंदरच्या अतिक्रमणावरुन मच्छीमार संघर्ष पेटणार

वसई – वसई गावातील समुद्र किनाऱ्यावर वसलेले पाचुबंदर गाव येथील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही अतिक्रमणे त्वरित हटवावी अन्यथा येत्या १० दिवसात ठिय्या आंदोलनाचा इशारा वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेने दिला आहे. दरम्यान या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून संस्थेच्या शिष्टमंडळाने संबंधित वसई -विरार महापालिका प्रशासन आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांची मंगळवारी भेट घेऊन या कारवाईची पुढील रूपरेखा व त्यातील तांत्रिक अडचणी संबधी विस्तृत चर्चा केली.

मौजे पाचुबंदर येथील सर्वे क्र. ८० (अ) या शासकीय जागेवर मागील काही वर्षात वाणिज्य वापरासाठी मोठी अतिक्रमणे करण्यात आली असून 14 हजार लोकवस्ती असलेल्या या भागात जवळपास 300 हुन अधिक मासेमार बोटी कार्यरत आहेत. बेकायदा रेती उत्खनन केल्याने येथील 1 किमी लांबी आणि 300 मीटर रुंदी असलेला किनारा पूर्णतः खचला. त्यामुळे बोटी शाकारण्यासाठी पाहिजे तशी आता जागाच शिल्लक राहिलेली नाही.
गंभीर म्हणजे तिवरांच्या झाडांची कत्तल करून धुपप्रतिबंधक बंधारे तोडून ही अतिक्रमणे झाली आहेत आणि याठिकाणी या बांधकाम केलेल्या जागेचा सर्रास वाणिज्य वापर केला जात असून भविष्यात या भागात समुद्राचे मोठाले अतिक्रमण होणार यात अजिबात शंका नाही, या संदर्भात वसई तहसीलदार व पालिका अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांचा संपर्क झाला नाही.

तहसीलदारांच्या आदेशाला हरताळ?
पाचूबंदर भागात लुद्रिक, आवळु, पंकज बाट्या, आदींची या भागात व्यावसायिक बेकायदा बांधकामे आज ही डौलाने उभी आहेत. त्यास वीजपुरवठा, सोयी सुविधा देण्यात येऊ नये असा आदेश तहसीलदार, वसई यांनी पारीत केला असतानाही याठिकाणी बेकायदा बांधकामे केलेल्या अतिक्रमणास राजरोजसपणे विज, पाणी आणि अन्य सुविधा ही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे वसई तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे

संघर्ष पेटणार?
जागा कमी असल्याने मांडव टाकून बोटीचे सामान ठेवण्यासाठी मोठी स्पर्धा या जागेवर लागली आहे. परिणामी त्यामुळे कलह, कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिति निर्माण होत आहे, एकूणच हा संघर्ष वाढून त्याचे उग्र स्वरूप धारण होईल अशीच स्थिति आज पाचुबंदर भागात असून हा संघर्ष टाळण्यासाठी सदर शासकीय जागेवरील अतिक्रमणे त्वरित हटवणे आवश्यक असल्याचे सर्वोदय मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष संजय कोळी यांनी व्यक्त केले.

अतिक्रमणधारकांची कायद्याची पळवाट
काही अतिक्रमण धारकांनी न्यायालयात दाद मागून तात्पुरते अभय तर मिळवले आहे. मागे वळून पहिले तर मागील 10 एप्रिल 2018 रोजी पाचूबंदराच्या अतिक्रमणावर कारवाईचा दिवस ठरला असतानाही ही तोडू कारवाई झाली नाही आणि त्याचा थेट फायदा आज अतिक्रमणधारकांना झाला असून कारवाईत जाणीवपूर्वक विलंब करून आणखी विलंब करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे असा ही आरोप मच्छिमार संस्थेने केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More