वसईत गोवर-रुबेला लस सर्टिफिकेटऐवजी लाभार्त्यांना झेरॉक्सचे वितरण – eNavakal
मुंबई

वसईत गोवर-रुबेला लस सर्टिफिकेटऐवजी लाभार्त्यांना झेरॉक्सचे वितरण

वसई – गोवर -रुबेला लसीकरण मोहिमेबाबत “कहि गम कही ख़ुशी” असे वातावरण असताना आता या लसीकरण मोहीमेअंतर्गत लाभार्त्यांना चक्क लसीकरणानंतर मूळ सर्टीफिकेट देण्याऐवजी त्याची झेरॉक्स स्वरूपात प्रत दिली जात असल्याचे आमची वसई संघटनेचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांच्या निदर्शनास आणले आहे. त्यांनी ही गंभीर बाब महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून देखील पालिकेच्या आरोग्य विभागाने कुठलीही दखल घेतलेली दिसून आली नाही, याउलट समोर मिळालेले उत्तर हे मात्र धक्कादायक असल्याचे ही कळते.

ढगे यांच्या माहितीवरून अंगणवाडी क्र.९६ मधे गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेत मूळ सर्टीफिकेटचा वापर न करता चक्क त्याच्या झेरॉक्स प्रतिचा सर्रास वापर होत असताना रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी पाहिले, त्यांनी तात्काळ येथील आरोग्य सेविकेला या मूळ सर्टीफिकेटची झेरॉक्स प्रत का वापरण्यात येते याबाबत विचारले असता आरोग्यसेविकेने गोवर-रुबेला लसीकरण सर्टीफिकेट संपली असून मागील आठ दिवसांपासून आम्ही आरोग्य विभागाकडे सर्टीफिकेटची मागणी करत आहोत, ती मिळत नसल्सानेच आम्ही अश्या झेरॉक्स पालकांना देतोय असे धक्कादायक उत्तर मिळाले.

दरम्यान याबाबत स्वतः राजेंद्र ढगे यांनी पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सर्टीफिकेट आजच उपलब्ध झाली आहेत तर ढगे यांच्या मागणीनुसार मागील काही दिवस ज्या बालकांना लसीकरण केले आहे अशा बालकांना आपण पुन्हा मूळ सर्टीफिकेट देणार आहेत का असे विचारले असता त्यांनी काहीच ठोस उत्तर दिले नाही.

देशभर सुरु असलेली गोवर-रुबेला लसीकरण मोहीम याआधीच वादात आहे. असे असताना देखील सर्टीफिकेटची झेरॉक्स प्रत लाभार्थी पालकांना देणे हे कितपत योग्य आहे याची कुणीच कशी पर्वा करत नाही. त्यात हे सर्टीफिकेटची झेरॉक्स पालिकेच्या आरोग्य विभागाने साक्षांकित केली नसल्याने त्याची प्रमाणपत्र वैधता किती आहे हे मात्र कळण्यास मार्ग नाही. मोहीम राबवा पण सर्टीफिकेट नसताना राबवणे हे उचित नाही. सर्टीफिकेटच्या नावाने नवीन भ्रष्टाचार उघडकीस येईल का असाही संशय व्यक्त होत आहे. गोवर-रुबेला लसीकरण दर्जा गुणवत्तेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना हे नवीन झेरॉक्स सर्टीफिकेट प्रकरण मोहिमेला ब्रेक लावणार तर नाही ना याची आता धास्ती वाटते. तरीही पालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेउन संबधीत पालकांना मूळ सर्टीफिकेट मिळेल व पुन्हा असे दाखले कमी पडणार नाहीत अशी व्यवस्था करावी.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More