वसईजवळील ‘पाणजू बेट’ अभिनव पर्यटनस्थळ होणार – eNavakal
मुंबई

वसईजवळील ‘पाणजू बेट’ अभिनव पर्यटनस्थळ होणार

वसई – पूर्वीचा ठाणे जिल्हा आणि आताचा पालघर जिल्हा म्हणजेच वसई तालुक्याच्या खाडीच्या सुरुवातीलाच बेटांच्या वेशीवर स्थिरावलेला वसई खाडीमधील एक सुंदर पाणजू गाव नव्हे तर पाणजू बेटाचा पर्यटनस्थळ म्हणून आता केंद्र व राज्य सरकारकडून विकास केला जाणार आहे. या संदर्भात नुकतीच पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन म्हणून गावचा नेमका आराखडा तयार करण्यासाठी या बेटाची आपल्या शिष्टमंडळासोबत पाहणी केली.

त्यामुळे आता सरकारच्या इच्छशक्तीने हे पाणजू बेट पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यास चालना मिळाली असून पुढे हेच पाणजू बेट जिल्ह्यातील एकमेव असे अभिनव पर्यटनस्थळ होईलच यात अजिबात शंका नाही, परंतु स्वातंत्र्यापासून उपेक्षित राहिलेल्या गावातील अनेक समस्या मात्र दूर होण्यास मदत मिळेल किंबहुना त्या होतील आणि त्यामुळे विकासकाबरोबर रोजगाराची संधी देखील निर्माण होणार आहे.

दरम्यान या बेटाचा विकास कशा प्रकारे करण्यात येईल हे आराखडा तयार झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यातच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सोयी सुविधांवर अधिक भर देण्यात येणार असून पाणजू गावाच्या विकासाच्या व सोयीसुविधा याच्या दृष्टीने तशा प्रकारचा आराखडाही तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे यावेळी गावचे सरपंच आशीष भोईर यांनी सांगितले. एकूणच पाणजू बेट पर्यटनस्थळ झाल्यास येथील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय या बेटावर विकासात्मक कामे मार्गी लागतील, असेदेखील येथील पाणजू ग्रामस्थांनी म्हटले आहे .

गावात जायला रस्ता नाही; फेरीबोटशिवाय पर्याय नाही

वसई खाडीतील भाईंदर आणि नायगाव यांच्यामध्ये पाणजू नावाचे बेट असून मागील अनेक वर्षांपासून पाणजू बेटाचा विकास झाला नव्हता. मुळातच हे गाव दुर्लक्षित राहिले, या बेटावर जाण्यासाठी कुठलाही पक्का रस्ता अथवा पायवाट नाही, कारण आजूबाजूला केवळ पाणीच पाणी आहे, त्यामुळे फेरी बोटीतून जावे लागते. त्यामुळे गावकरी असो अथवा प्रशासन असो सर्वचीच गैरसोय होत होती.

नीती आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय

पर्यटनस्थळ नीती आयोगाने देशामधील बेटांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि देशात एकूण १ हजार ३८२ बेटे आहेत. त्यापैकी अगदी पहिल्याच टप्प्यात २६ बेटांचा विकास केला जाणार असल्याने या २६ बेटांच्या यादीत पालघर जिल्हा आणि त्यात वसई तालुक्यातील पाणजू बेटाची निवड करण्यात आलेली आहे.

बेट समग्र विकास अंतर्गत निधी मिळणार !

पाणजू बेटाच्या विकासासाठीचा आरखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर व कोकण विभागीय आयुक्त यांनी पाणजू गावाला मंगळवारी भेट देऊन पाहणी केली असता बेट समग्र विकास म्हणजेच (हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ आयलँडस प्रोग्राम) या कार्यक्रमांतर्गत या बेटाचा पर्यटन विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेमधून निधी उपलब्ध केला जाणार आहे.

पाणजू बेटावर पर्यटनाच्या दृष्टीने विविध संधी उपलब्ध असून अधिक चांगल्या प्रकारच्या जागाही या गावात उपलब्ध असल्याने पर्यटनासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र , राज्य शासन आणि डी पी सीच्या माध्यमातून निधीही चांगल्या प्रकारे येईल, तसेच या गावाला चांगल्या सोयी सुविधाही उपलब्ध होऊन रोजगार वाढण्यास मदत होणार असल्याचे  पालघर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सांगितले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More