वसईच्या समुद्रात तेल उत्खनन मोहीम सुरु; मच्छिमारांमध्ये संताप – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

वसईच्या समुद्रात तेल उत्खनन मोहीम सुरु; मच्छिमारांमध्ये संताप

वसई – दरवर्षीप्रमाणे यंदाही वसईच्या समुद्रात ओएनजीसी कंपनीने हजारो पारंपरिक मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता वसईतील त्यांच्या समुद्रातील मासेमारी क्षेत्रातच पुन्हा एकदा तेल उत्खनन मोहीम तथा साईस्मिक सर्वेक्षण प्रभावी पणे सुरू केले आहे. समुद्रातील या मोहिमेला ओएनजीसीने १ जाने-२०१९ रोजी सुरुवात केली असून हे सर्वेक्षण येत्या 25 फेब्रुवारी-२०१९ असे तब्ब्ल 56 दिवस सुरू राहणार असल्याचे सांगत इतका काळ समस्त मच्छिमार बांधवांना समुद्रात जाऊन मासेमारी करता येणार नसल्याची माहिती वसई मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष संजय कोळी यांनी दिली.

दरम्यान ओएनजीसी या तेल कंपनीच्या सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत घेतलेल्या या निर्णयामुळे आता समस्त मच्छीमार समाज आणि या बंद काळात पुढे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हि निर्माण झाला आहे. एकूणच पर्ससीन मासेमारीवर बंदी असताना देखील पारंपरिक मच्छीमारांच्या क्षेत्रात भांडवलदार पर्ससीन व्यावसायिकांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच समुद्रातून मासेमारीच्या क्षेत्रात केवळ धनिकांच्या व्यापारी जहाजासाठी मार्ग तयार करण्याचा घाट आहे. नानाविध तक्रारी, सूचनाच्याविरुद्ध शासन दरबारी अनेकदा निवेदने देऊनही मच्छीमार समाजाची दखल घेतली जात नसताना आता मच्छीमारांना विश्वासात न घेताच वसईच्या समुद्रात तेल संशोधनाची मोहीम सुरू करण्यात आल्यामुळे मच्छीमारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

परिणामी दुसरीकडे तेल उत्खननाच्या काळात मासेमारी पूर्णतः बंद राहत असल्यामुळे जवळपास उत्तन, वसई, अर्नाळा आदी गावातील शेकडो बोटी व १५ हजार पेक्षा जास्त कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालणार हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे, तर या बंदी काळात मच्छिमार बांधवांचे करोडो रुपयांचे नुकसान शासन कसे भरून देणार याउलट सरकारकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी आता पुन्हा विविध मच्छीमार संघटनांकडून मागील अठरा वर्षांपासून हि मागणी सातत्याने होत असतानाही मच्छीमारांना नुकसान भरपाई दिली जात नाही त्यामुळे नुकसान भरपाईचा वाद आता वेगळ्या रूपात आणि नव्याने उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे

कशी आहे ही मोहीम

पोलर मर्क्यूस या महाकाय जहाजद्वारे शेअर वॉटर” या कंपनीकडून b66 परिसरात ५ नॉटिकल माइल्सच्या गतीने 24 तास समुद्रातील तेल शोध सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. हे सर्वेक्षण 24 तास कार्यरत असून या जहाजाच्या मागे ६ हजार मीटर लांबीच्या ८ ते १० लोखंडी केबल समुद्रातील तेलाच्या साठ्याचा खोलवर शोध घेणार आहेत. त्या कॅबल्स जहाजाच्या पुढे ७ मीटर तर मागे 30 मीटर पाण्याखाली असणार आहेत. या जहाजाच्या पाठीमागे असणाऱ्या ६ हजार मीटर लांबीच्या केबलला लाईट असणाऱ्या टेलबॉय लावण्यात आली असून हे जहाज निरंतर चालत राहणार आहे.

मासेमारी क्षेत्रातच मच्छिमारांना मज्जाव

सर्वेक्षण मोहिमेत समुद्रात फिरतीवर असलेल्या या जहाजाला अचानक वळण घेता येत नसल्याने मच्छिमारांनी आपल्या बोटी आणि जाळ्यांना या जहाजाच्या मार्गिकेत न आणण्याचा सज्जड दम वजा सूचनेसोबत मच्छीमार बांधवांनी आपली मासेमारी थांबवावी अशा सक्त सूचनाही एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

बंदोबस्तासाठी गार्ड व स्थनिक मच्छिमार ?

किंबहुना या महाकाय जहाजाच्या मार्गिकेत कोणी मच्छीमार येऊ नये म्हणून एक सहाय्यक जहाज आणि २५ ते ३० गार्ड हे बंदोबस्त साठी ठेवण्यात आले आहेत. या सहाय्यक बोटीवर काही स्थानिक मच्छीमारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत वायरलेस सेटद्वारे सूचना देऊन मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना या जहाजाच्या मार्गातून हुसकावून लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

सरकारच्या संवेदना क्षमल्या असून त्यांना मच्छिमार समाजाचे काहीही देणेघेणे नाही याउलट हे आणि असे सर्वेक्षण राबवून सरकार समुद्र संपत्ती नष्ट करते आहे,
या सर्वेचा गंभीर परिणाम मासेमारी, जलप्रदूषण आणि अनेक समुद्र जीव आणि त्यातील सृष्टी वर होत असून सरकारने आता तरी समुद्र पर्यावरण विषय हा गंभीरतेने हाताळला पाहिजे. सरकार आम्हाला केवळ डिझेल वर सबसिडी देते, आज आम्ही मासेमारी करून शकत नाहीत, मार्केटमध्ये मच्छी नाही, पूर्ण व्यवहार ठप्प आहेत.
त्याखेरीज आता हे दोन महिने कसे काढायचे आणि सरकार एक नवा रुपया अथवा आर्थिक अशी कुठलेही आर्थिक नुकसान भरपाई देत नाही. हा आमच्या वसई, उत्तन ,अर्नाळा आदी अशा १५ हजारहून अधिक मच्छिमार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असून तो कसा सुटेल या विचारांनी आता मच्छिमार विचारांच्या ओझ्याखाली आहे,”

केंद्र आणि राज्य सरकारच्या मच्छीमारविरुद्ध धोरणामुळे आधीच किनारपट्टीवरचा मच्छीमार संतप्त झालेला असताना आता या संतापात पुन्हा एकदा दरवर्षी प्रमाणे ओएनजीसीचे तेल पडल्याने उत्तन,वसई आणि अर्नाळा आदी भागात राहणाऱ्या मच्छीमार समाजातून कोणत्याही वेळी सरकार विरोधी आंदोलनाचा मोठा भडका उडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More