वसईच्या मालजीपाड्यात तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त – eNavakal
मुंबई

वसईच्या मालजीपाड्यात तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त

वसई –  वसई पूर्वेस मालजीपाडा हद्दीतील खाडीच्या बेटावर दलदलीमध्ये अवैद्य गावठी दारूच्या हातभट्टीच्या अड्यावर छापा टाकून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत तो त्वरित वालिव पोलिसांनी नष्ट केला आहे, या प्रकरणी वालिव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार आणि त्यांच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. याप्रकरणी वालिव पोलिसात तीन आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी आणि आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

मात्र या कारवाईत दारूचा अड्डा चालवणारे तीन आरोपी पाणी, दलदल आणि झाडाझुडपांचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. भरत राऊत, मुरलीधर पाटील आणि विशाल पाटील अशी या तीन आरोपींची नावे आहेत. मालजीपाडा खाडीच्या बेटावर दलदलीत नवसागर मिश्रित गावठी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती वालिव पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार बुधवारी वालिव पोलिसांनी आपल्या पथकासमवेत बोटीने जाऊन याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत हातभट्टी तयार करण्याचे द्रव्य व सामुग्री, गावठी दारू बनवणारे नवसागर मिश्रित गुळाचा वॉश असा एकूण 4 लाख 34 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो त्याच जागी नष्ट केला. याप्रकरणी पोलीस आता पळून जाण्यात यशस्वी झालेल्या तिघा आरोपींचा शोध घेत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More