वल्‍लभभाईंच्या पुतळ्याजवळील 15 मगरींना पाण्यातून हटविले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

वल्‍लभभाईंच्या पुतळ्याजवळील 15 मगरींना पाण्यातून हटविले

बडोदा – जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या नर्मदा नदीतील सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळील जलाशयातून गुजरातच्या वनविभागाने 15 मगरींना हलवून दुसर्‍या ठिकाणी नेऊन सोडले. या जलाशयात ‘सी-प्लेन’ने पर्यटकांना आणून जलाशयातून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दाखविण्याचे प्रयोजन आहे. त्यामुळे पर्यटन वाढणार आहे. मात्र या जलाशयात मगरी असल्याने ‘सी-प्लेन’ पाण्यावर उतरविण्यास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून मगरींना हलविण्यात येत आहे. वल्‍लभभाईंच्या पुतळ्याजवळील नर्मदा नदीत तीन विस्तीर्ण जलाशय आहेत. या जलाशयांमध्ये एकूण 485 मगरी आहेत.

सरदार सरोवर धरण परिसरात या मगरींचा वावर आहे. या तीन जलाशयांपैकी जलाशय क्रमांक 3 म्हणजेच ‘मगर तलाव’ येथील मगरींना हलविण्यात आले आहे. या मगर तलावाच्या जागी ‘सी-प्लेन टर्मिनस’ तयार करावयाचे आहे. त्यासाठी माशांचे भक्ष्य ठेवून मगरींना पिंजर्‍यात पकडले जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More
post-image
News देश

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात! चित्रपटासाठी गीत लिहिले नाही! जावेद अख्तर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या चित्रपटात नरेंद्र...
Read More