वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी – eNavakal
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा आरोप करीत वर्सोवातील काही रहिवाशांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने एमएमआरडीएसह पालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत बांधकामाला दिलेली स्थगिती चार आठवड्यांसाठी कायम राहणार आहे.
वर्सोवा ते लोखंडवाला या प्रस्थापीत मार्गाच्या बांधकाम प्रकरणी वर्सोवा येथील जय भारत सोसायटीला नोटीस बजावली आहे. या बांधकामामुळे येथील कांदळवन बाधित होणार असून कामामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होणार आहे. त्यामुळे सोसायटीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून नियमांचे उल्लंघन करून काम करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. प्रतिवाद्यांना याप्रकरणी प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे आदेश देऊन सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More