वर्ल्ड कपचं थीम सॉंग ऐकलंत? – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

वर्ल्ड कपचं थीम सॉंग ऐकलंत?

नवी दिल्ली – विश्व चषक क्रिकेट स्पर्धा येत्या ३० मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे सध्या जगभरात क्रिकेट फिवर दिसत आहे. विश्व चषक स्पर्धेसाठी खेळाडूंप्रमाणेच चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी)ने शुक्रवारी सोशल मीडियावरून वर्ल्ड कपचं थीम सॉंग शेअर केलं आहे. ‘Stand By’ असे या गाण्याचे बोल असून Rudimental या बँडने हे गाणं गायलं आहे. काल सायंकाळी साधारण ६ वाजता शेअर केलेल्या या गाण्याला तुलनेने कमी लाईक्स मिळाले आहेत. अनेक चाहत्यांनी या गाण्याला नापसंत केले आहे. साल २०११मध्ये भारतीय गायक शंकर महादेवन यांनी गायलेल्या ‘दे घुमाके’ या सुप्रसिद्ध गाण्याची तुलना सध्या Stand By बरोबर केली जात आहे. Stand By या गाण्यामध्ये युनायटेड किंगडमच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

दरम्यान, यावर्षी विश्व चषक स्पर्धेत जगभरातील १० देश सहभागी होणार आहेत. यंदा चौथ्यांदा विश्व चषक स्पर्धेचे इंग्लंडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी साल १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More