वर्कशॉप वाचविण्यासाठी गोदी कामगारांची उत्स्फुर्तपणे निदर्शने – eNavakal
News मुंबई

वर्कशॉप वाचविण्यासाठी गोदी कामगारांची उत्स्फुर्तपणे निदर्शने

मुंबई – मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासन वर्कशॉप्स कामगारांसह माझगाव डॉकला देऊन टाकणार असल्याची चर्चा असल्यामुळे वर्कशॉप्समधील विविध शॉप्सच्या कामगारांनी आज एकत्र येऊन वर्कशॉप्सच्या प्रवेशद्वाराजवळ उत्स्फुर्तपणे निदर्शने केली. प्रमुख जुन्या बंदरांना आर्थिकदृष्ट्या आजारी करून नवीन लहान बंदरांना जन्म द्यायचा तसेच खाजगी बंदरांकडे मालाच्या बोटी वळवून त्यांना उतेजन द्यायचे, या धोरणामुळे जुन्या बंदरातील कामगारांच्या हितसंबधावर गदा आली आहे. हजारो निवृत्त कर्मचार्‍यांना द्यायला पेन्शन फंड सक्षम नाही. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याचे प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. वर्कशॉप्स शेजारच्याच माझगाव डॉकला देण्याचा पोर्ट ट्रस्ट प्रशासनाचा प्रस्ताव असल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी असल्यामुळे कामगारांनी आज निदर्शने केली. निदर्शकांनी वर्कशॉप्स वाचवा, पोर्ट ट्रस्ट वाचवा, कामगार वाचवा, हम सब एक है, अशा जोरदार घोषणा दिल्या आणि कामगार आपल्या कामावर रुजू झाले.
ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. एस. के. शेट्ये यांनी निदर्शकांसमोर भाषण करताना सांगितले की, केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे सर्वच उद्योगात ही परिस्थिती आहे. सर्व मालकवर्ग एक झाले मात्र कामगारवर्ग एकत्र नाही. मात्र यापुढे सर्व कामगार संघटनांना एकत्र घेऊन आपली युनियन कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे राहिल याची ग्वाही दिली आणि कामगारांनी एकजुटीने व सजगतेने राहण्याचे सांगितले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वर्कशॉप्स माझगाव डॉकला देणे, ड्राय डॉक कोचिन शिपयार्डला देणे, हे प्रश्न महत्वाचे असून कामगाराना विश्वासात घेऊन कामगार हिताचे निर्णय घेतले जातील. वर्कशॉपबाबत कोणताही लेखी प्रस्ताव पोर्ट ट्रस्ट विश्वस्तांच्या मीटिंगमध्ये आला नाही. याप्रसंगी युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, मारुती विश्वासराव यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे उपाध्यक्ष विजय पंदिरकर यांनी केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पालघरमध्ये 5 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दाखल

वाडा- जिल्ह्यातील ज्या अतिदुर्गम भागात मोठी अ‍ॅम्ब्युलन्स जात नाही त्या ठिकाणच्या रुग्णांना आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 5 आरोग्य केंद्रांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

ग्रामीण भागातील चिंबोरी, मुठ्यांना शहरी भागात वाढली मागणी

विक्रमगड- पावसाळा सुरू झाला की सार्‍यांनाच वेध लागतात ते म्हणजे रानभाज्यांसोबत काळ्याभोर चिंबोर्‍या आणि खेकड्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणार्‍या चिंबोर्‍या आणि खेकडे विक्रमगड बाजारात तसेच...
Read More
post-image
News मुंबई

बेस्टमध्ये नवीन 500 कंत्राटी कामगारांची भरती

मुंबई,-बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात बेस्टच्या आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत प्रशासन आणि कमिटीने खासगी कंत्राटदाराकडून 500 नवीन कंत्राटी कामगार भरती केले आहेत. त्यामुळे गेले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पलुच्या धबधब्यावर 31 जुलैपर्यंत जाण्यास बंदी

विक्रमगड- जूनच्या शेवटच्या आठवडयात विक्रमगड व परिसरात दमदार असा पाऊस झाल्याने नदी, नाले, ओव्हळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतामध्ये पाणी साठलेले आहे व...
Read More
post-image
News महाराष्ट्र

म्हारळ हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड ‘ओव्हर फ्लो’

उल्हासनगर- कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डम्पिंग ग्राऊंड ओव्हर फ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डम्पिंग ग्राऊंड तयार...
Read More