वडिलांनी स्मिथची क्रिकेट किट बॅग केली पॅक – eNavakal
News क्रीडा विदेश

वडिलांनी स्मिथची क्रिकेट किट बॅग केली पॅक

सिडनी – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. दोघांनीही या प्रकरणी चाहत्यांची आणि देशाची माफीही मागितली. या दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाचा मनस्ताप झाला आहे. स्मिथने सिडनीत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी तो हमसून हमसून रडला. त्यानंतर आता त्याच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्मीथचे वडील पीटर स्मिथ आपल्या मुलाची क्रिकेट किट बॅग पॅक करताना दिसत आहेत.
याबाबत पीटर स्मिथ यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, पुढचे एक वर्ष आपला मुलगा क्रिकेट खेळणार नाही. त्यामुळे ही किट बॅग पॅक करुन बाजूला ठेवून देणेच चांगला पर्याय आहे. दक्षिण आफ्रिकेहून सिडनीमध्ये पोहोचल्यानंतर स्मिथने पत्रकार परिषद घेतली आणि आपली चूक झाली, हे मान्य केले होते. मला माफ करा. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मी झाल्या प्रकाराची सर्व जबाबदारी स्वीकारतो. बॉल टॅम्परिंग माझी घोडचूक होती, अशी कबुली स्मिथने दिली. हे सांगतानाच त्याला रडूही कोसळले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More